मधुमेह नियंत्रित करण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय माहितीय का?

मधुमेह नियंत्रित ठेवणे हे आजचे सर्वात मोठे आव्हान आहे. आपल्या आजूबाजूला काही असे घटक आहेत, जे मधुमेह म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास आपल्याला मोलाची मदत करीत असतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही या पदार्थांचा आहारातही समावेश करू शकता.

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय माहितीय का?
डायबेटिसचा धोका वेळीच ओळखा!
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 10:55 AM

मुंबईजगाचा विचार केल्यास भारतात मधुमेहींची संख्या सर्वाधिक आहे. धावपळीचे जीवन, आहारातील असमतोल, व्यसन, ताण-तणाव, अनुवांशिकता असे अनेक घटक मधुमेहासाठी (diabetes) कारणीभूत ठरत असतात. अनेकांची रक्तातील साखरेची पातळी इतकी वाढते की ती नियंत्रित (control) करण्यासाठी कसोशिने प्रयत्न करावे लागतात. मधुमेहातून अनेक आजार निर्माण होत असतात. बहुतेक लोक मधुमेहाशी झुंज देत आहेत. मधुमेह असला की, रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय वाढते. अ‍ॅलोपॅथी उपचारासोबतच काही घरगुती उपायांचा अवलंब करून रक्तातील साखरेची (blood sugar) पातळी नियंत्रित करू शकता. अशा परिस्थितीत आपल्या आहाराची काळजी घेणेदेखील खूप महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करू शकता ज्यामुळे साखर नियंत्रित राहण्यास मदत होईल. मधुमेहाच्या रुग्णांनी कोणता आहार घ्यावा याबाबत संभ्रम असतो. आपल्या रोजच्या आहारात मेथीचे दाणे, आवळा ज्यूस आणि कारल्याचा रस समाविष्ट केल्यास यातनू मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होत असते.

मेथीचे दाणे

मेथीमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. एक चमचा मेथी पावडर सकाळी रिकाम्या पोटी घ्या. या पावडरचे दररोज कोमट पाण्यासोबत सेवन करा. मेथीमध्ये फायबर असते जे पचनास मदत करते. तसेच कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे प्रमाण संतुलित करण्यास मदत करते.

दालचिनी

दालचिनी हा घटक प्रामुख्याने मसाल्यांमध्ये वापरला जात असतो. दालचिनीमुळे रक्तातील ग्लुकोज वाढण्यासही प्रतिबंध बसतो. दालचिनीमध्ये एक बायोएक्टिव्ह घटक असतो जो शरीरातील इन्सुलिन क्रियाकलापांचे नियमन करतो. एक चमचा दालचिनी पावडर कोमट पाण्यात मिसळून दिवसातून एकदा सेवन करा. दालचिनी पाण्यात उकळूनही तिचा आहारात समावेश करु शकतात.

आवळ्याचा रस

मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवळ्याचा वापर फार पूर्वीपासून करण्यात आला आहे. त्यात क्रोमियम नावाचे खनिज असते जे कार्बोहायड्रेट्स नियंत्रित करण्यास मदत करते तसेच इन्सुलिनला पातळीसाठीही ते पोषक असते. २ चमचे आवळ्याचा रस एका ग्लास पाण्यात मिसळून सकाळी प्यावा. यात आपण चिमूटभर हळददेखील घालू शकता. लिंबू, संत्री आणि टोमॅटो यांसारखे इतर व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थ देखील मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात.

कारल्याचा रस

अनेकांना कारल्याचा रस पिणे अवघड जावू शकते, परंतु मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक चमत्कारी उपाय ठरू शकतो. कारल्याचा रस काकडी किंवा सफरचंदच्‍या ज्यूसमध्‍ये मिसळून त्याचा वापर करु शकतात. यातून त्याची चव थोडी चांगली होईल. कारल्याचा रस रोज प्यायल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी प्रभावीपणे नियंत्रित राहते.

संबंधीत बातम्या :

एका काळी “सोने की चिड़िया” होता भारत देश, काय कारण होते असे म्हणण्या मागे, जाणून घेवूया यामागील सत्य!

हिजाब आणि बुरखा यांच्यात काय फरक आहे? मराठी मुली पण हिजाब घालतात? खरंच?

अक्कल दाढ आल्यावर खरंच अक्कल येते? अक्कल दाढेच्या इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्या!

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.