Skin Care Tips : ‘या’ पदार्थांच्या वापराने त्वचेवर होईल जादुई परिणाम, जाणून घ्या कसा करावा वापर

स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे बरेचसे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी तर फायदेशीर असताताच पण त्याचा आपल्या त्वचेलाही खूप फायदा होतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी यापैकी काही पदार्थ सौंदर्य प्रसाधने म्हणूनही वापरण्यात येतात.

Skin Care Tips : 'या' पदार्थांच्या वापराने त्वचेवर होईल जादुई परिणाम, जाणून घ्या कसा करावा वापर
स्कीन केअरImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 3:47 PM

भारतीय स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे बरेचसे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी तर फायदेशीर असताताच पण त्याचा आपल्या त्वचेलाही खूप फायदा होतो. त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी यापैकी काही पदार्थ सौंदर्य प्रसाधने म्हणूनही वापरण्यात येतात. त्यापैकीच काही पदार्थ म्हणजे हळद (Turmeric) आणि बेसन (Gram Flour). आपल्याला सर्वांना माहीत आहे की हळदी अतिशय औषधी आहे. त्यामध्ये ॲंटीसेप्टिक गुणधर्मांसोबत ब्लीचिंगचे गुणधर्मही असतात. आयुर्वेदात हळदीला औषधी गुणधर्मांचा खजिना संबोधले जाते. त्यामध्ये ॲंटी-व्हायरल, ॲंटी-ऑक्सीडेंट आणि ॲंटी-फंगल गुणधर्म असतात, जे शरीराचा अनेक आजारांपासून बचाव करतात. त्वचेसाठीही हळद खूप उपयोगी ठरते. तिच्या वापरामुळे त्वचा उजळते आणि चमकदार बनते. तर बेसन, म्हणजेच चणाडाळीच्या पीठातही एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात. याच कारणामुळे आपल्याकडे लग्नात अथवा इतर समारंभातही हळद लावली जाते तसेच बेसनाचे उटणेही (Ubtan) वापरले जाते. जर तुम्हालाही तुमची त्वचा हेल्दी, चमकदार आणि उजळणारी हवी (Healthy and Glowing Skin)असेल तर या गोष्टींचा वापर करा.

– जर तुमची त्वचा उन्हामुळे काळवंडली असेल तर तुम्ही हळदीचा वापर करून ती पूर्ववत करू शकता. एका भांड्यात थोडे दही घ्या, आता त्यामध्ये पाव चमचा हळद घाला. हे मिश्रण नीट एकत्र करून काळवंडलेल्या भागावर लावून मसाज करा. 10-15 मिनिटांनी दही-हळदीचे मिश्रण लावलेला भाग पाण्याने स्वच्छ धुवा. याचा नियमितपणे वापर केल्यास त्वचेवरील टॅनिंग दूर होऊन ती पूर्ववत होईल तसेच ती चमकदारही होईल.

– शरीरावरील डेड स्कीन हटवण्यासाठी आणि त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही तुम्ही दही-बेसनाच्या मिश्रणाचा वापर करू शकता. एका भांड्यात थोडे दही घेून त्यात चिमुटभर हळद मिसळा. हे मिश्रण हलक्या हाताने फेटून चेहऱ्यावर हळुवारपणे लावावे आणि थोडा मसाज करावा. अर्ध्या तासाने चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुवा. रोज याचा वापर केल्यास डेड स्कीन निघून जाईल.

– चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग यामुळे हल्ली अनेक जण त्रस्त दिसतात. ते दूर करण्यासाठी एका वाटीत एक चमचा बेसन घ्यावे. त्यामध्ये चिमुटभर हळद, अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडेसे पाणी घालावे व पेस्ट तयार करावी. ही पेस्ट त्वचेवर लावावी व अर्धा तास तशीच ठेवावी. ते वाळल्यानंतर अर्ध्या तासाने चेहरा स्वच्छ धुवावा. ही क्रिया आठवड्यातून किमान 2 वेळा तरी करावी. अपेक्षित परिणाम दिसून येईल.

– डेड स्कीन हटवण्यासाटी उटणे बनवायचे असेल तर दोन बदाम भिजत घालावेत. थोड्या वेळानंतर ते बारीक वाटून घ्यावेत. त्यामध्ये दोन चमचे बेसन, अर्धा चमचा तांदळाचे पीठ, दही आणि चिमुटभर हळद मिसळा. त्यामध्ये अगदी थोडेसे तिळाचे तेल घालून हे मिश्रण नीट ढवळा. उटणे तयार होईल. हे उटणे चेहऱ्यावर आणि जिथे डेड स्कीन असेल तिथे लावून थोडा वेळ मालिश करा. त्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा. या उटण्यामुळे त्वचेवरील डेड स्कीन तर निघून जाईलच त्यासोबतच टॅनिंगची समस्याही दूर होईल.

– जर तुमची त्वचा तेलकट असेल बसनामध्ये दह्याऐवजी दूध वापरू शकता. त्यामध्ये चिमुटभर हळद मिसळून फेसपॅक तयार करू शकता. हा पॅक चेहऱ्यावर लावून सुमारे अर्ध्या तासाने पाण्याने धुवून टाकावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात चंदन पावडरही मिसळू शकता. त्याच्या नियमित वापराने त्वचा उजळेल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.