Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धान्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा

बऱ्याच वेळा आपण बघितले असेल की, घरामध्ये साठवलेल्या धान्याला बुरशी किंवा किडे होतात.

धान्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी 'या' टिप्स नक्की ट्राय करा
धान्य
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 1:11 PM

मुंबई : बऱ्याच वेळा आपण बघितले असेल की, घरामध्ये साठवलेल्या धान्याला बुरशी किंवा किडे होतात. ही समस्या बदलत्या हवामानामुळे देखील होते. काही लोक यासाठी कीटकनाशके देखील वापरतात. परंतु याचा उपयोग करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. परंतु आपण काय करावे जेणेकरून धान्य खराब होणार नाही आणि स्टोअर बराच काळ टिकेल. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. (Try these tips to keep the grain for a long time)

चांगल्या दर्जाचे धान्य

जर आपल्याला धान्य साठवायचे असेलतर खरेदी करतानाच चांगल्या दर्जाचे धान्य खरेदी करा. चांगल्या दर्जाचे धान्य बऱ्याच दिवस राहू शकते. यामुळे दीर्घ कालावधीसाठी धान्य साठवणे सोपे होईल.

ओलाव्याची काळजी घ्या

डाळी व तांदूळ साठवताना हे लक्षात ठेवा की, त्यामध्ये ओलावा नसावा. ओलावामुळे धान्य लवकर खराब होऊ शकते. म्हणून स्वच्छतेची खास काळजी घ्या.

तांदूळ कसा सुरक्षित ठेवावा

तांदूळ बराच काळ साठवून ठेवण्यासाठी त्यात कोरडे पुदीनाची पाने घाला. या व्यतिरिक्त तुम्ही त्यात कडुलिंबाची पाने आणि तिखटही घालू शकता. असे केल्याने कोणतेही कीटक लागत नाही.

डाळी टिकवण्यासाठी

डाळीमध्ये काही कडुनिंबाची पाने घाला. याशिवाय तुम्ही त्यात मोहरीचे तेल देखील घालू शकता. यानंतर, उन्हात चांगले वाळवा आणि कंटेनरमध्ये ठेवा. यामुळे आपली डाळ बऱ्याच कालावधीपर्यंत टिकू शकते.

गहू कसा सुरक्षित ठेवावा

बरेच लोक घरी गहू स्वच्छ करतात आणि पोत्यांमध्ये ठेवतात. मात्र, गहू हा नेहमी मोठ्या कंटेनरमध्ये ठेवावा. बऱ्याच दिवस गहू चांगला ठेवण्यासाठी गहूमध्ये आपण कांदा टाकावा. यासाठी आपण एक क्विंटल गव्हासाठी सुमारे अर्धा किलो कांदे वापरू शकता. असे केल्याने, आपला गहू बराच काळ सुरक्षित राहील.

इतर उपाय

धान्य टिकवण्याचा चांगला मार्ग म्हणजे प्लास्टिकचे कंटेनर. यासाठी आपण कंटेनर जिथे ठेवाल ती स्टोअर रूम पुन्हा पुन्हा उघडू नका आणि धान्य खराब झाले आहे का हे 10 ते 15 दिवसांत एकदा तपासा. धान्य साठवण्याची जागा हवेशीर असली पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…

(Try these tips to keep the grain for a long time)

दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र.
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?.
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल.
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका.
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा.