Weight loss: वजन कमी करायचंय ? ट्राय करू शकता ही ट्रेंडी डाएट्स

तुम्हालाही वजन कमी करण्यासाठी बेस्ट डाएट हवे असेल तर 2022 सालात ट्रेंडमध्ये असणाऱ्या या डाएट्सपैकी एखादे डाएट फॉलो करून पहा.

Weight loss: वजन कमी करायचंय ? ट्राय करू शकता ही ट्रेंडी डाएट्स
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 11:20 AM

नवी दिल्ली – आजकाल वजन कमी करण्यासाठी (weight loss) अनेक जण बरंच वर्कआऊट आणि विविध व्यायामप्रकार (workout and exercise) यांचा रोजच्या दिनचर्येत समावेश करत असतात. इंटरनेटवरही वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय शोधत असतात. पण आज आम्ही तुम्हाला काही अशा डाएट्सबद्दल सांगणार आहोत जी 2022 या वर्षात सर्वात जास्त ट्रेंडमध्ये (diets in trend) होती. जर तुम्हीही सध्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ही डाएट्स फॉलो करून पाहू शकता.

मेडिटेरेनिअन डाएट

मेडिटेरेनिअन डाएट मध्ये थोड्या ऑलिव्ह-ऑईलसह संपूर्णपणे प्लांट बेस डाएटचा समावेश असतो. या डाएटचा संपूर्ण फोकस केवळ ताजे अन्न खाण्यावर असतो. या डाएटमध्ये साधारणत: ताजी फळं, भाज्या, शेंगदाणे आणि धान्य यांचा समावेश असतो. त्यासह थोडे मासे आणि चिकन अथवा अंडी हेही असते. मात्र या मेडेटेरेनिअन डाएटमध्ये दुग्धजन्य पदार्थ, लाल अथवा प्रक्रिया केलेले मांस आणि गोड पदार्थ यांचे सेवन अतिशय कमी केले जाते. या डाएटमध्ये गाजर, कांदे, ब्रोकोली, केल, लसूण, झुकिनी, मशरूम, मटार आणि मिश्र भाज्यांचा समावेश असतो.

हे सुद्धा वाचा

फ्लेक्सिटेरिअन डाएट

हे शाकाहारी व मांसाहारी डाएट यांचा मिश्र प्रकार आहे. हे डाएट पोषक तत्वांनी समृद्ध असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत करते. त्यामध्ये शाकाहार अधिक व मांसाहार कमी करण्यावर भर दिला जातो. हे डाएट वजन कमी करण्यास मदत तर करतेच, त्याशिवाय हृदयरोग आणि टाइप -2 मधुमेहाचा धोकाही या डाएटमुळे कमी होतो.

पॅलिओ डाएट

यंदा, 2022 साली वजन कमी करणाऱ्या लोकांमध्ये पॅलिओ हे डाएट खूप प्रसिद्ध झाले. या डाएटमध्ये ताजी फळं आणि भाज्या, बियाणे आणि शेंगदाणे, लीन मीट, ओमेगा 3 फॅटी ॲसिडने समृद्ध असलेले मासे आणि प्रक्रिया न केलेले तेल यावर भर असतो. हे डाएट वजन कमी करण्यास, भूक कमी करण्यास, ब्लड शुगर ( रक्तातील साखरेची पातळी) आणि ब्लड प्रेशर (रक्तदाब) नियंत्रित करण्यास मदत करतो. मात्र हे डाएट पॉलो करताना (संपूर्ण) धान्य, शेंगा, दुग्धजन्य पदार्थ, प्रक्रिया केलेल पदार्थ, मीठ, प्रक्रिया केलेली साखर या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

(डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.