मुलायम आणि चमकदार केस हवी आहेत? मग ‘हे’ 6 घरगुती उपाय नक्की ट्राय करा!
हल्ली केसांच्या समस्यांमुळे प्रत्येक जण चिंतेत असतो. केसगळती आणि केसांमधील कोंडाही एक समस्या सामान्यच झाली आहे.
मुंबई : हल्ली केसांच्या समस्यांमुळे प्रत्येक जण चिंतेत असतो. चांगल्या केसांसाठी फक्त चांगले उत्पादने वापरून उपयोग नाही, तर केसांची योग्य काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा महागड्या उत्पादनांतूनही केसांना पाहिजे असलेली पोषक तत्त्वे मिळत नाहीत. त्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागतात. यावर समस्यांवर घरच्या घरी काही मिश्रण एकत्र करून तुम्ही आयुर्वेदिक उपाय करू शकता. ज्यामुळे तुमचे केस चांगले आणि चमकदार होऊ शकतात. (Try this home remedy for soft and shiny hair)
-कोरडे केस टाळण्यासाठी नेहमी हेयर मास्क वापरला पाहिजे. जर आपण बाजारातून तयार हेअर मास्क विकत घेत असाल, तर केसांच्या गुणवत्तेनुसार खरेदी करा. या पेक्षा आपण घरच्या घरी हेअर मास्क तयार करा आणि आपल्या केसांना लावा. यासाठी दोन चमचे नारळ तेलात 4 चमचे, कोरफड जेल आणि 3 चमचे दही मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांवर लावा आणि अर्धा तास तशीच सोडा. नंतर कोमट पाण्याने केस धुवा. आपण आठवड्यातून एकदा हा उपाय करू शकता.
-कोरफड, नारळ तेल आणि कांद्याचा रस यांचे तेल घरी तयार करून केसांना लावले तर केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. तेल तयार करण्यासाठी सर्वात अगोदर कांदा बारीक किसून अथवा कांदा ज्यूसरमधून काढला तरी चालतो मात्र, कांद्याचा रस हा ताजा असावा. त्यानंतर कोरफड द्या कोरफडीचा बाजूचा सर्व भाग काढून टाका त्यानंतर कांद्याचा रस कोरफड आणि नारळाचे तेल एकत्र करा रोज हे तेल केसांना लावा यामुळे तुमचे केस सुंदर, जाड, लांब आणि मजबूत दिसतील.
-अळशीची पूड दोन चमचे, नारळाचे तेल चार चमचे, फुल क्रीम मिल्क एक कप, अंड्यातील पिवळे बलक एक, दही तीन चमचे सर्वात अगोदर आपण अळशीच्या बियांपासून जेल तयार करून घ्या. यासाठी एका पॅनमध्ये अळशीच्या बियांची पावडर घ्या. त्यामध्ये दूध आणि एक वाटी पाणी ओता. गॅसच्या मध्यम आचेवर जवळपास 20 मिनिटे मिश्रण शिजू द्या सामग्री घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा आणि एका वाटीमध्ये मिश्रण गाळून घ्या.
-दोन चमचे दही, एक चमचा कोरफड जेल, ऑलिव्ह ऑइल एक चमचा एका वाटीमध्ये सर्व सामग्री एकत्र घ्या आणि पेस्ट तयार करा. आपल्या केसांच्या लांबीनुसार सामग्रीचे प्रमाण ठरवू शकता. टाळूसह संपूर्ण केसांवर हे पॅक लावा. 20 मिनिटे आपल्या टाळूचा हलक्या हाताने मसाज करावा. हेअर पॅक केसांमध्ये 40 मिनिटांसाठी राहू द्यावे. यानंतर हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या आणि कंडिशनर देखील लावा.
-दहीमध्ये अँटी फंगल गुणधर्म आहेत जे डोक्यातील कोंडा आणि स्काल्पशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यामुळे खाज सुटण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो. डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी, दह्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घाला. या मिश्रणाने आपल्या स्काल्पची मालिश करा आणि कोरडे होऊ द्या. व्यवस्थित कोरडे झाल्यानंतर केस कोमट पाण्याने धुवा.
-2 ते 3 चमचे बेकिंग सोडा घेऊन, त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याला लावून 10 ते 15 मिनिटांनी केस धुवून टाका. बेकिंग सोड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे केसांच्या समस्या कमी होतात.
(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
संबंधित बातम्या :
Home Remedies | हिवाळ्यात टाचेवरील भेगांमुळे त्रस्त आहात, तर ही खास बातमी तुमच्यासाठी!https://t.co/i2qsnJSJmQ #Homeremedies #skincare #Skin
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2020
(Try this home remedy for soft and shiny hair)