Skin Care : मान काळवंडलीय? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा, होतील फायदे

आपण सर्वजण त्वचेच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देतो. परंतु मान आणि कोपरांच्या स्वच्छतेकडे म्हणावे तसे लक्ष देणे होत नाही.

Skin Care : मान काळवंडलीय? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा, होतील फायदे
आवळ्यामधील अँटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते. एक चमचा आवळा पावडर घ्या आणि गरम पाण्यात मिसळा. चेहरा स्क्रब करण्यासाठी या पेस्टचा वापर करा, पाच मिनिटांनंतर चेहरा धुवा. आपणास हवे असल्यास आपण पेस्टमध्ये थोडी हळद देखील घालू शकता.
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 11:01 AM

मुंबई : आपण सर्वजण त्वचेच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देतो. परंतु मान आणि कोपरांच्या स्वच्छतेकडे म्हणावे तसे लक्ष देणे होत नाही. ज्यामुळे आपले कोपरे आणि मान काळी दिसते. मानेचा काळपटपणा काढण्यासाठी विविध प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर हा केला जातो. मात्र, त्यानंतर चार ते पाच दिवसांनंतर परत मान काळीच दिसते. मात्र आपण काही घरगुती उपाय करून मानेवरचा काळपटपणा काढू शकतो. (Try this home remedy to get rid of dark circles on the neck)

कोरफड

कोपरांचा आणि मानेचा काळपटपणा काढण्यासाठी कोरफड अत्यंत फायदेशीर आहे. कोरफड मानेला लावल्यानंतर मानेवरील काळपटपणा दूर होण्यास मदत होते. कोरफडमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे त्वचेमध्ये मेलेनिनचे उत्पादन कमी करण्यास मदत करतात. मानेवर कोरफड लावण्यासाठी आपल्याला कोरफडमधील गर काढावा लागेल. कोरफड मानेवर लावा, काही मिनिटे स्क्रब करा. सुमारे वीस मिनिटांनंतर मान थंड पाण्याने धुवा.

अॅपल व्हिनेगर

आपल्यापैकी बर्‍याचजणांना हे माहित आहे की अॅपल व्हिनेगर त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त हे त्वचेतून मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. यासाठी, आपल्याला 2 चमचे अॅपल व्हिनेगर थोड्या पाण्यात मिसळावे लागेल. हे मिश्रण कापूसच्या सहाय्याने मानेवर लावा. साधारण दहा मिनिटे तसेच ठेवा आणि पाण्याने मान धुवा. हा उपाय आपण आठवड्यातून दोन वेळा केला पाहिजे. यामुळे मानेवरील काळपटपणा जाण्यास मदत होईल.

बदाम तेल

बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि ब्लीचिंग एजंटचे गुणधर्म असतात. या दोन्ही गोष्टी त्वचेचा रंग वाढविण्यासाठी कार्य करतात. बदाम तेलाचे काही थेंब घ्या आणि आपल्या मानेवर मालिश करा. यामुळे मानेचा काळपटपणा दूर होण्यास मदत होते. बदामांमध्ये व्हिटामिन ई भरपूर प्रमाणात असते. बदाम तेल चेहऱ्यावरील काळे डाग दूर करून, रंग उजळण्यास मदत करते. दररोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा.

दही

दह्यामध्ये नैसर्गिक एंजाइम असतात. जे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते. मानेवरील काळपटपणा काढण्यासाठी दोन चमचे दही घ्या आणि मानेवर लावा. 15 मिनिटांसाठी ही पेस्ट मानेवर राहूद्या आणि थंड पाण्याने धुवा. ही पेस्ट आपण आठवडाभर सतत मानेवर लावली तर मानेचा काळपट दूर होण्यास मदत होते.

बटाटा

बटाट्यामध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात. जे त्वचेचा रंग चांगला करण्यास मदत करतात. यासाठी, आपल्याला बटाटा किसून घ्यावा लागेल आणि त्याचा रस काढावा लागेल. हा रस आपण मानेवर लावा आणि सुमारे 15 मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा हा रस मानेला लावा.

लिंबू

अर्ध्या लिंबाला कापून त्यामध्ये मीठ टाका आणि कोपर आणि मानेवर लावा. दहा मिनिटांनंतर ते ओल्या कपड्याने स्वच्छ करुन घ्या. त्यानंतर  बाऊलमध्ये खायचा एक चम्मच सोडा घ्या आणि पांढरं टूथपेस्ट त्यात मिसळा. ही पेस्ट मानेवर आणि कोपरावर लावा. सुखल्यानंतर धुवून घ्या. त्यानंतर मॉईश्चरायझर लावा.

टोमॅटो

टोमॅटो मिक्सरमधून बारिक पेस्ट करुन घ्या. कोपर आणि मानेवर लावा. 20 मिनटांनंतर धुवून घ्या. एका आठवड्यात तीनवेळा हे केल्याने काळपटपणा दूर होईल.

मसूर डाळ

मानेवरील आणि कोपरावरील काळपटपणा दूर करण्यासाटी मसूरचा दाळ रात्री भिवजून घ्या. त्यानंतर सकाळी मिक्सरमधून बारिक करुन घ्या. त्यामध्ये कच्च दूध मिसळा आणि काळवंडलेल्या त्वचेवर लावा. 15 ते 20 मिनटांनंतर पाण्याने धुवून घ्या.

(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

संबंधित बातम्या : 

Holi 2021 | रासायनिक रंगानी होऊ शकतो कर्करोगाचा धोका, होळीच्या रंगाचा बेरंग होण्यापूर्वी जाणून घ्या दुष्परिणाम!

(Try this home remedy to get rid of dark circles on the neck)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.