रात्री झोपण्यापूर्वी खा केवळ दोन खजूर, होतील अनेक फायदे!
खजूर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर असतात.
मुंबई : खजूर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर असतात. हे केवळ आपल्या प्रतिकारशक्तीलाच चालना देत नाही तर आपल्याला बर्याच रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करते. आपण दररोजच्या आहारात खजूरचा समावेश करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात खजूर खाण्याचे नेमके कोणते फायदे आपल्या आरोग्याला होतात. (Two at night before bed Eating date palm is beneficial for health)
हाडे मजबूत बनवते खजूरामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. हे हाडांसाठी फायदेशीर आहे, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. तसेच हाडांशी संबंधित समस्यांना देखील यामुळे कमी होतात.
डोळ्यांसाठी फायदेशीर दररोज खजूर खाणे डोळ्यांसाठी चांगले आहे. खजुरामध्ये व्हिटॅमिन ए असते जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे ज्यांना डोळ्यांसंबंधीत काही त्रास आहे अशांनी खजूर खाल्ल्ये पाहिजे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते खजूरमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोईड्स, फिनोलिक अॅसिड असतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, ज्यामुळे आपल्या त्वचेला फायदा होतो.
निरोगी हृदयासाठी आयुर्वेदानुसार, खजूर एक चमत्कारी औषध असून यामुळे अनेक रोगांवर उपाय केले जातात. शारिरीक कमजोरी, शरीरात रक्ताची कमी किंवा हृदयरोग, जास्त तहान लागण्याची समय्या या सर्वांवर खजूर तुम्हाला मदत करु शकतो.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर वजन कमी करण्यासाठी खजूर अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खजूरचे सेवन केले पाहिजे.
केस आणि त्वचेसाठी फायदेशीर खजूरमध्ये व्हिटॅमिन ई असते. जे केसांना निरोगी आणि वाढण्यास मदत करते. खजूरमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी देखील असते. यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत होते.
(महत्त्वाचं : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण आहाराबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
Kidney Stone | मुतखड्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग, चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!
Skimmed Milk | स्किम्ड दुधाचे सेवन करताय? थांबा! आधी जाणून घ्या याचे दुष्परिणाम…
हळदीचे दूध पिण्याचे नेमके कोणते फायदे? वाचा याबद्दल अधिक !https://t.co/vDB6Rl4IyM #Turmericmilk | #HealthTips | #healthylifestyle | #immunityboostertips | #Food | #lifestyle
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 20, 2021
(Two at night before bed Eating date palm is beneficial for health)