एप्रिलमध्ये येताहेत दोन लाँग विकेण्ड, प्लानिंग करा आणि बॅगा भरा, फिरायला निघा…
कार्पोरेट कार्यालय असो की सरकारी कार्यालय नोकरदार मंडळी नेहमी लाँग विकेण्डची वाट पाहात असतात. आपल्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत फिरण्यासाठी एप्रिल महिन्यात दोन लाँग विकेण्ड येत आहेत. त्यामुळे आता पासूनच तयारीला लागा, प्लानिंग करा आणि बॅगा भरा आणि फिरायला निघा..

एप्रिल महिन्यात दोन लाँग विकेण्ड आले आहेत. या विकेण्डला तुम्ही शहराबाहेर थंड हवेत फिरायला जाऊ शकता. या विकेण्डला तुम्ही नजिकच्या थंड हवेच्या ठिकाणी किंवा समुद्र किनाऱ्यांवर फिरायला मजा करायला जाऊ शकता. अलिबाग, हरिहरेश्वर किंवा पनवेल वा विरार कर्जत येथे एखाद्या रिसोर्टला जाण्याचा प्लानिंग करु शकता. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांना सह्याद्रीचे शिवरायांचे किल्ले खुणावत असतील…
केव्हा आहे विकेण्ड
पहिला लाँग विकेण्ड तुम्हाला १० ते १४ एप्रिल दरम्यान चालून आला आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच लाँग विकेण्डचा लाभ चालून आला आहे. पहिला एक्सटेंडेड ब्रेक महावीर जयंतीपासून सुरु होणार आहे. जी गुरुवारी १० एप्रिल रोजी आहे.तसेच १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.म्हणजे तुम्ही जर शुक्रवारी ११ एप्रिल रोजी सुट्टी घेतली तर तुम्हाला ५ दिवसांचा लाँग विकेण्ड मिळणार आहे. आंबेडकर जयंतीला अनेक राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. त्यामुळे या लाँग विकेण्डचा फायदा उठवून तुम्ही देखील फिरायला जाऊ शकता.
दुसरा लाँग विकेण्ड –
पहिला लाँग विकेण्ड १० ते १४ एप्रिल रोजी आहे तर दुसरा लाँग विकेण्ड १८ ते २० एप्रिल दरम्यान आहे. एप्रिलचा दुसरा लाँग विकेण्ड गुड फ्रायडे सोबत सुरु होणार आहे. गुड फ्रायडे १८ एप्रिल रोजी शुक्रवारी आहे. तर रविवारी इस्टर संडे आहे. हा तीन दिवसांचा छोटा परंतू शानदार विकेण्ड आहे.यात तीन दिवसात देखील लोक मस्त आरामात एडव्हेंचर ट्रीप करु शकतात.




लांबचा प्रवास करायचा असेल
जर तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर या विकेण्डला तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी शिमला- कुलु मनालीला जाऊ शकता.जर तुम्हाला गंगा आरती करायची असेल तर ऋषिकेश देखील तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण ठरेल. तसेच बंगाल येथील दार्जिलिंगला भेट देण्यासाठी खूप चांगले ठरणार आहे. येथे तुम्हाला चहाचे मळे आणि टॉय ट्रेन नक्कीच आवडेल. तसेच,कांचनजंगा टेकड्यांचे सुंदर दृश्य तुमचे मन मोहून टाकतील…