पार्किन्सन्सची लक्षणे पूर्ववत करण्यासाठी मेंदूत उपकरण प्रत्यारोपित; यूकेच्या डॉक्टरांनी घडवला इतिहास! 

पुढे हॉवेल्स म्हणाले की, ऑपरेशननंतर 12 महिन्यांनंतर पुन्हा बॉक्सिंग डेला आम्ही गेलो आणि 4 किमी चाललो. आम्ही आणखी पुढे जाऊ शकलो हे आश्चर्यकारक होते. सध्या पार्किन्सन्स रोगावर कोणताही उपचार नाहीये. पार्किन्सन्समध्ये थरथरणे, मंद हालचाल यांचा समावेश होतो. नवीन DBS प्रणाली ही आतापर्यंतची सर्वात लहान आहे.

पार्किन्सन्सची लक्षणे पूर्ववत करण्यासाठी मेंदूत उपकरण प्रत्यारोपित; यूकेच्या डॉक्टरांनी घडवला इतिहास! 
Image Credit source: parkinson.org
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 3:09 PM

लंडन : जगामध्ये पहिल्यांदाच ब्रिटनच्या (Britain) डॉक्टरांनी पार्किन्सन्स आजाराची लक्षणे पूर्ववत करण्यासाठी मेंदूमध्ये एक यंत्र प्रत्यारोपित केले आहे. ब्रिस्टलमधील एका हॉस्पिटलमधील डाॅक्टरांनी पार्किन्सन्समुळे होणारे असामान्य मेंदू सेल फायरिंग पॅटर्न ओव्हरराइड करण्यासाठी एक लहान डीप ब्रेन स्टिम्युलेशन (Brain stimulation) यंत्र वापरले आहे. यासंदर्भात बीबीसीने सविस्तर अहवाल दिला आहे. चाचणीचा भाग म्हणून उपचार घेणारे पहिले टोनी हॉवेल्स यांनी सांगितले की, ऑपरेशनच्या (Operation) अगोदर मी माझ्या बायकोसोबत फिरायला गेलो होतो आणि मी कारपासून 182 मीटर अंतरावर आलो. मला फिरून परत जावे लागले, कारण मला चालता येत नव्हते. हॉवेल्स यांचे 2019 मध्ये ऑपरेशन झाले होते.

DBS ही आतापर्यंतची सर्वात लहान प्रणाली

पुढे हॉवेल्स म्हणाले की, ऑपरेशननंतर 12 महिन्यांनंतर पुन्हा बॉक्सिंग डेला आम्ही गेलो आणि 4 किलो मीटर चाललो. आम्ही आणखी पुढे जाऊ शकलो हे खरोखरच माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होते. सध्या पार्किन्सन्स रोगावर कोणताही उपचार नाहीये. पार्किन्सन्समध्ये थरथरणे, मंद हालचाल यांचा समावेश होतो. नवीन DBS प्रणाली ही आतापर्यंतची सर्वात लहान आहे. यात उपकरणासाठी एक लहान बॅटरी प्रणाली असते जी नंतर मेंदूच्या भागात थेट विद्युत आवेग वितरीत करते. इलेक्ट्रिक प्रोब कवटीच्या माध्यमातून आणि मेंदूच्या मध्यभागी खोलवर सबथॅलेमिक न्यूक्लीमध्ये टाकल्या जातात.

स्मरणशक्तीची समस्या निर्माण होते

हॉवेल्स म्हणाले की, पार्किन्सन्स किती निराशाजनक आहे हे आपल्यासोबत घडल्याशिवाय कोणालाही अजिबात समजू शकत नाही. हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ अॅलन व्होन यांच्या मते, जर तुम्ही जास्त वृद्ध असाल किंवा तुमच्या पार्किन्सन्सचा भाग म्हणून तुम्हाला स्मरणशक्तीची समस्या आली असेल, तर हे तुमच्या आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही. परंतु जर तुम्ही पार्किन्सन्सने ग्रस्त तरुण व्यक्ती असाल, ज्याच्या मेंदूची शस्त्रक्रिया होऊ शकते तर ते त्या गटासाठी अधिक लागू होते. पुढे जर या उपचाराला वैद्यकीय मान्यता दिली तर त्याचा फायदा होऊ शकणाऱ्या लोकांची संख्या दुप्पट होऊ शकते.

या आजाराची सुरुवात हळूहळू होते

हा आजार स्त्री आणि पुरुष दोघांनाही होऊ शकतो. याचा परिणाम स्त्रियांपेक्षा 50 टक्के अधिक पुरुषांवर होतो. हा आजार वृद्धांना अधिक प्रभावित होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्याची सुरुवात हळूहळू होते, म्हणजेच त्याची लक्षणे कधी दिसू लागली हे कळत नाही. काही आठवडे किंवा महिन्यांनंतर, जेव्हा लक्षणांची तीव्रता वाढते. तेव्हा काहीतरी चुकीचे असल्याची भावना होते. हा आजार तेव्हा होतो, जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागातील चेतापेशी किंवा न्यूरॉन्स नष्ट होऊ लागतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.