Ulcerative Colitis च्या रुग्णांची टाळावे हे 4 पदार्थ, आतड्यांवर करतात दुष्परिणाम
Ulcerative Colitis : अल्सरेटिव्ह कोलायटीस हा एक असा आजार आहे जो लवकर बरा होत नाही. यामध्ये रुग्णांना पुन्हा पुन्हा शौचास जावे लागते. यामध्ये रुग्णांना पोट दुखी, शौचातून रक्त येणे, वजन कमी होणे, ताप येणे असे वेगवेगळी लक्षणं दिसतात. यामध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे असते.
Ulcerative Colitis : आतड्याला आपल्या शरीराचा दुसरा मेंदू म्हटले जाते. हा अवयव शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे मेंदूच्या सिग्नलवर काम नाही करत करत. हे मज्जासंस्थेद्वारे चालवले जाते, जे पचन प्रक्रियेसाठी थेट जबाबदार असते. आपल्या संपूर्ण पचनसंस्थेसाठी आतड्याचे चांगले आरोग्य महत्त्वाचे आहे. अल्सरेटिव्ह कोलायटिस हा मोठ्या आतड्याचा एक आजार असून त्यामुळे आतड्यात सूज, जळजळ आणि जखमा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या समस्येमध्ये आतड्यात अल्सर होऊ शकतो. या अल्सरमध्ये सूज आल्याने ओटीपोटात दुखणे, स्टूलमध्ये रक्त येणे अशी लक्षणे दिसतात.
रक्तासह जुलाब, पोटदुखी, पेटके, गुदद्वारात दुखणे, वारंवार शौचास जाणे, मलविसर्जनात अडचण येणे, अचानक वजन कमी होणे, थकवा येणे, ताप येणे अशी लक्षणे दिसतात. हा रोग वेळेत कळल्यावर त्याची लक्षणे सहज टाळता येतात.
आतड्यांसंबंधी रोगात, तुमची स्वतःची प्रतिकारशक्ती तुमच्या आतड्याची शत्रू बनते आणि मोठ्या आतड्यावर हल्ला करू लागते. काही खाद्यपदार्थांचे सेवन आतड्यांसंबंधीच्या आजारांमध्ये फायदेशीर असले तरी, विशिष्ट प्रकारच्या पदार्थांच्या सेवनाने आतड्यांवर दुष्परिणाम होतो. आतड्यांसंबंधी आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी या 4 पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे.
बीन्स खाणे टाळा
फायबर युक्त बीन्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु आतड्यांसंबंधी आजारांनी त्रस्त असलेल्यांनी त्यांचे सेवन करू नये. याचे सेवन केल्याने कोलायटिसची लक्षणे वाढू शकतात. यामुळे अतिसार किंवा मल लवकर बाहेर पडेल आणि पोटदुखी वाढू शकते.
या भाज्या खाऊ नयेत
ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट्स, कोबी आणि सेलेरी सारख्या फायबरने समृद्ध असलेल्या काही भाज्या आतड्यांसंबंधी रोगांच्या बाबतीत अजिबात खाऊ नयेत. हे पदार्थ आतड्यांसंबंधी समस्या वाढवू शकतात. अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या बाबतीत, हे पदार्थ गॅस, सूज आणि पोटदुखी वाढवू शकतात.
बियाणे टाळा
कोणत्याही प्रकारचे बियाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु ज्या लोकांना आतड्यांसंबंधी समस्या आहेत त्यांनी बियाणे खाणे टाळावे. या बियांचे सेवन केल्याने गॅस, अपचन आणि आतड्याची सूज वाढू शकते. ते पचायला वेळ लागतो, त्यामुळे कोलायटिस झाल्यास या बियांचे सेवन टाळावे.
गोड पदार्थ टाळा
आतड्यांसंबंधी समस्या असल्यास, आपण चॉकलेट, कॅफिन आणि गोड पदार्थांचे सेवन टाळावे. गोड पदार्थांचे सेवन केल्याने पोटदुखी, पेटके येणे, वारंवार शौचास जाणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.