10 लाख पुश-अप्सचा अनोखा विक्रम, कोण आहे केविन? जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला फिटनेसविषयी एक खास रेकॉर्डची माहिती देणार आहोत. जगातील अनेक जण फिटनेसला प्रेरणा देतात, पण केविन कुलमचा प्रवास या सर्वांपेक्षा वेगळा आहे. अमेरिकेतील या फिटनेस फ्रीकने आपल्या आयुष्यात एक असा विक्रम केला आहे जो ऐकून लोक आश्चर्यचकित होतात. जाणून घेऊया.

10 लाख पुश-अप्सचा अनोखा विक्रम, कोण आहे केविन? जाणून घ्या
Kevin KulamImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 08, 2025 | 3:26 PM

आज आम्ही तुम्हाला फिटनेसचा एक असा विक्रम सांगणार आहोत, जो वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तसेच तुम्ही लगेच आपले आरोग्य निरोगी राखण्याच्या कामाला लागाल. काही तर जिमही जॉईन करतील. कारण, ही बातमी अमिरेकेतील एका केविन कुलम यांच्या प्रवासावर आहे. जाणून घेऊया.

जगातील अनेक जण फिटनेसला प्रेरणा देतात, पण केविन कुलमचा प्रवास या सर्वांपेक्षा वेगळा आहे. अमेरिकेतील या फिटनेस फ्रीकने आपल्या आयुष्यात एक असा विक्रम केला आहे जो ऐकून लोक आश्चर्यचकित होतात. केविनने वर्षभरात 1 दशलक्ष पुश-अप पूर्ण केले आणि मानसिक आरोग्य जागरूकता मोहिमेचा एक भाग बनविला.

केविन कुलम म्हणतो की त्याचे ध्येय केवळ शारीरिक तंदुरुस्तीपुरते मर्यादित नव्हते. मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने त्याने हे चॅलेंज स्वीकारले. केविनचा असा विश्वास आहे की शारीरिक तंदुरुस्तीचा मानसिक आरोग्याशी जवळचा संबंध आहे. त्यानी आपल्या प्रवासात अनेकांना प्रेरणा दिली आणि नियमित व्यायामामुळे तणाव, नैराश्य आणि चिंता यांच्याशी लढण्यास कशी मदत होते हे सांगितले.

हे सुद्धा वाचा

हे कसे शक्य आहे?

केविनने आपले ध्येय गाठण्यासाठी दररोज सरासरी 2,740 पुश-अप केले. शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही हे मोठं आव्हान होतं. हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. थकवा आणि शारीरिक वेदनांनी त्याला कधी कधी थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची चिकाटी आणि निर्धार त्याला पुढे जाण्याचे बळ देत होता.

आपल्या मोहिमेदरम्यान केविनने सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो म्हणतात की, तुमचे शरीर म्हणजे तुमच्या मनाची सावली आहे. जर तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेतली तर तुमचं मनही निरोगी राहील.

केविन कुलमचे ध्येय केवळ पुश-अप रेकॉर्ड करणे नव्हते, तर फिटनेस आणि मानसिक आरोग्य हातात हात घालून चालते हा संदेश देणे हे होते. स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवू इच्छिणाऱ्यांसाठी त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.

केविन कुलम याच्या सारखं तुम्ही एकदा कोणतीही गोष्ट करायचं ठरवलं की ते पूर्ण होतं. आपण नेहमी जिमला जाण्याचा प्रयत्न करतो. काही दिवस जिममध्ये गेलो की पुन्हा सोडून देतो. असं न करता त्यात सातत्य असल्यास तुम्ही देखील केविन प्रमाणे मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. कारण, कोणतही ध्येय गाठण्यासाठी आधी छोट्या गोष्टीपासून सुरुवात करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला मोठं ध्येय गाठणं शक्य आहे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.