‘सोयाबीन’चा फेसपॅक वापरा, चेहऱ्यावरील डाग करा छुमंतर; वाचा सविस्तर
चेहऱ्यावरील डाग चेहऱ्याचे सौंदर्य खराब करतात. सोयाबीनपासून बनवलेल्या फेसपॅकच्या वापरामुळे हे डाग दूर होतात.
मुंबई : चेहऱ्यावरील डाग चेहऱ्याचे सौंदर्य खराब करतात. सोयाबीनपासून बनवलेल्या फेसपॅकच्या वापरामुळे हे डाग दूर होतात. यासाठी सोयाबीनमध्ये दही आणि लिंबू मिसळून पेस्ट बनवा. हा फेस पॅक 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. सोयाबीनमध्ये व्हिटामिन ई असते जे त्वचेतील मृत पेशी काढून टाकते आणि नवीन पेशी तयार करते. यासाठी सोयाबीन बारीक करून त्यात पाणी घालून त्याची पेस्ट बनवा. (Use a face pack made from soybeans to remove blemishes on the face)
ही पेस्ट 20-25 मिनिटे चेहऱ्यावर लावल्याने चेहरा सुधारतो. आपण आठवड्यातून तीनदा हा मास्क वापरू शकता. सोयाबीन हा प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो, म्हणून तो आहारात सामील करणे पौष्टिक असते. सोयाबीन तुमचे सौंदर्य वाढवण्यात देखील मदत करू शकते. खरं तर, सोयाबीनमध्ये व्हिटामिन ई आणि व्हिटामिन ए बरोबरच भरपूर खनिज घटक असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.
त्वचेच्या घट्टपणासाठी देखील सोयाबीन खूप फायदेशीर आहे. यासाठी सोयाबीनमध्ये डाळिंबाची दाणे जाडसर वाटून, त्यात थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. साधारण 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. असे केल्याने चेहर्याची चमक वाढेल आणि घट्टपणाही येईल. 1 चमचे संत्र्याच्या सालीचा पावडर घ्या त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचे मध घालाव. ही हे पेस्ट चांगली मिक्स करा यानंतर 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर ही पेस्ट लावून ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
त्वचा तेलकट असल्यास एका वाटीमध्ये संत्र्याच्या सालींची पेस्ट आणि चंदन पावडर एकत्र घ्या व फेस पॅक तयार करा. या पॅकमुळे तेलकट त्वचेवरील मुरुमांची समस्या हळूहळू दूर होण्यास मदत मिळू शकते. त्वचेवर नैसर्गिक तेज येईल आणि त्वचा सैल देखील पडणार नाही. तसंच मुरुम आणि ब्लॅकहेड्सची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळू शकते.मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी आणि चेहरा निखारण्यासाठी दही आणि अळशीचा फेसपॅक खूप प्रभावी आहे.
दही चेहऱ्याला मॉइश्चराईझ करण्याचे काम करते, तर अळशीमध्ये व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे त्वचा चमकते आणि निरोगी होते. पॅक बनविण्यासाठी, एक चमचा अळशीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी हे वाटून दोन चमचे दह्यामध्ये मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. सुमारे 15 मिनिटे ते अर्धा तास ठेवा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे करा.
संबंधित बातम्या :
World Food Day | अन्नाशी संबंधित चुकीच्या सवयी बदलण्याची गरज, अन्यथा गंभीर आजारांना बळी पडण्याची शक्यता!https://t.co/Pj0BJ2wYau#WorldFoodDay2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
(Use a face pack made from soybeans to remove blemishes on the face)