भोपळा, कोबी ते काकडी… वजन कमी करण्यासाठी काय काय खावं?
वजन कमी व्हावे (weight loss), असे आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असते. जेव्हा वजन कमी करण्याचा विचार केला जातो.
मुंबई : वजन कमी व्हावे (weight loss), असे आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असते. जेव्हा वजन कमी करण्याचा विचार केला जातो, तेव्हा अनेकदा हेवी वर्कआउट्स आणि डाएटिंग सल्ला दिला जातो. परंतु, यामुळे आपल्याला स्लिम-ट्रिम बॉडी मिळेलच, असे नाही. तसेच या गोष्टी आपल्या शरीरासाठी हानिकारक देखील ठरू शकतात. (Use these tips to loss weight)
अन्नातून आपल्या शरीराला पोषण मिळते, जे आपल्या शरीरास तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्याचे कार्य करतात. फक्त आपण योग्य आहार घेऊन आपले वजन कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात नेमका कुठला आहार घेतल्याने वजन कमी होऊ शकते. ‘हर्बल टी’ पिऊ शकता. ‘हर्बल टी’ने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसेच, ‘हर्बल टी’ आपल्या पचन तंत्रासाठीदेखील चांगला आहे.
दररोज ‘हर्बल टी’चे नियमित सेवन केल्याने तुमचे वजनही कमी होते. बर्याच संशोधनांमध्ये असे आढळले आहे की, हर्बल टी प्याल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. हर्बल टी टीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे आपल्या स्लीपिंग पॅटर्नला सुधारण्यास मदत करतात. तसेच, दररोज हर्बल टीचे सेवन केल्याने शरीरातील साखर नियंत्रणात राहते.
कोबीमध्ये व्हिटामिन सी, के आणि ए जास्त प्रमाणात असतात. तसेच ॉपॅन्टोथेनिक अॅसिड (बी 5), पायरीडोक्सिन (बी 6), थायमिन (बी 1), राइबोफ्लेविन (बी 2) नियासिन (बी 3) सारखी आवश्यक जीवनसत्त्वे देखील मुबलक प्रमाणात आढळतात. कोबी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात बरेच पौष्टिक पदार्थ आहेत. हे सॅलडमध्ये खाल्ल्याने शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढतात. तसेच पचनशक्ती मजबूत होते. याशिवाय दररोज कोबी खाण्याने वजन कमी होण्यास मदत होते.
भोपळा, काकडी, स्क्वॅश सारख्या हिरव्या भाज्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. व्हिटामिन-एने समृद्ध हिरव्या भाज्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारतात आणि पाचक शक्ती वाढविण्यात मदत करतात. त्यामुळे निरोगी आणि तंदुरुस्तच राहते, परंतु वजन कमी करण्यास देखील मदत करते. लिंबूवर्गीय फळांमध्ये कमी प्रमाणात कॅलरी आढळतात. त्यामुळे वजन कमी कमी होण्यास मदत होते. सिट्रसमध्ये व्हिटामिन-सी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आपल्या पाचन तंत्राची देखील काळजी घेतली जाते. यामुळे आपल्याला फार काळ भूक लागत नाही.
संबंधित बातम्या :
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Narendra Modi | मोदींचा फिटनेस मंत्र तुम्हाला माहितीये का?https://t.co/A1wk5o4uS5 #NarendraModi #fitness
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 27, 2020
(Use these tips to loss weight)