निरोगी त्वचा हवीय तर मग हे 5 फेसपॅक वापराच, काहीच दिवसांत रिझल्ट दिसेल!
हळदीला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्तव प्रप्त झाले आहे. हळद आरोग्यदायी असण्याबरोबरच सौंदर्यवर्धक देखील आहे. यांनी घरच्या घरी हळदीचे फेस मास्क कसे बनवावे याबाबत माहीती करुन घेणार आहोत .
चेहऱ्याचा पोत सुधारण्यासाठी- २ चमचे चण्याच्या पिठात, अर्धा चमचा हळद आणि १ चमचा लिंबाचा रस घालून मऊसर पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटे ठेऊन थंड पाण्याने चेहरा धुवा. हा पॅक आठवड्यातून दोनदा लावा. हळद आणि चण्याच्या पिठामुळे त्वचा उजळते.
Follow us
त्वचेतील डाग कमी करण्यासाठी – चमचाभर हळदीमध्ये पाणी, दूध किंवा दही घालून ओलसर पेस्ट बनवा. पेस्ट चेहऱ्याला लावून गोलाकार पद्धतीने हळुवार मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे ब्लॅकहेड्स निघतील, त्वचा मऊ होईल आणि त्वचेचे पोर्स टाईट होतील.
त्वचेतील सुरकुत्या कमी करण्यासाठी – चमचाभर मधात हळद आणि दूध घालून ओलसर पेस्ट बनवा. १०-१५ मिनिटे ठेवा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे त्वचेचा पोट सुधारतो, सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेचा टोन समान होतो.
चेहऱ्याला तेजी देण्यासाठी – अंड्याच्या सफेद भागात चमचाभर हळद घाला. ऑलिव्ह ऑईल घालून पेस्ट बनवा. १०-१५ मिनिटे ठेवा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या मास्कमुळे त्वचा उजळेल. त्वचेचा टोन सुधारेल. त्वचेत मॉईश्चर टिकून राहील आणि चेहऱ्यावर चमक येईल.
ब्लॅकहेड्स- कोथिंबिरीच्या पानात दोन चमचे हळद घालून त्याची बारीक पेस्ट बनवा. चेहरा, नाक, हनुवटी, कपाळ यावर झोपण्यापूर्वी लावा. असे आठवड्यातून दोनदा केल्यास ब्लॅकहेड्सची समस्या कमी होईल.
चेहऱ्याचा पोत सुधारण्यासाठी- २ चमचे चण्याच्या पिठात, अर्धा चमचा हळद आणि १ चमचा लिंबाचा रस घालून मऊसर पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटे ठेऊन थंड पाण्याने चेहरा धुवा. हा पॅक आठवड्यातून दोनदा लावा. हळद आणि चण्याच्या पिठामुळे त्वचा उजळते.