लांब, निरोगी आणि चमकदार केसांसाठी असा वापरा टोमॅटो, सगळ्या समस्या होतील दूर

जाड, लांब आणि चमकदार केस सर्वांनाच आवडतात. परंतु अनेक कारणांमुळे केस कोरडे आणि खराब होऊ लागतात. यासाठी लोक केसांची निगा राखण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादने आणि उपचारांचा अवलंब करतात. पण त्या ऐवजी तुम्ही स्वयंपाक घरात उपलब्ध असलेला टोमॅटो वापरू शकता.

लांब, निरोगी आणि चमकदार केसांसाठी असा वापरा टोमॅटो, सगळ्या समस्या होतील दूर
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 5:21 PM

प्रत्येक मुलीचे स्वप्न असतं की तिचे केस लांब, जाड आणि चमकदार असावेत. पण प्रदूषण, अनहेल्दी फूड आणि रासायनिक गोष्टींच्या वापरामुळे केस खराब होऊ लागतात. केस गळायला लागतात कोरडे होतात आणि निर्जीव देखील होतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक उपाय सर्वोत्तम मानले जातात. ज्यामुळे केस मजबूत होण्यास मदत मिळते.

टोमॅटो केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. टोमॅटो ज्याचा आपण आपल्या जेवणात वापर करतो तो केसांसाठी देखील फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ए, सी आणि के तसेच त्यात असलेले अँटिऑक्सिडंट केसांचे पोषण करतात आणि केसांना लांब मजबूत आणि चमकदार बनविण्यासाठी मदत करतात. यासोबतच टोमॅटोमुळे टाळूची खोलवर सफाई सुद्धा होते आणि कोंड्यासारख्या समस्येपासून सुटका मिळते. जर तुम्हाला तुमच्या केसांची चमक परत मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेण्यासाठी टोमॅटोचा आवश्यक वापर करा. जाणून घेऊया केसांसाठी टोमॅटोचे फायदे आणि त्याचा वापर करण्याची योग्य पद्धत.

टोमॅटोचे केसांना होणारे फायदे

केसांना मजबूत बनवते: जर तुमचे केस खूप गळत असतील किंवा ते कोरडे आणि निर्जीव झाले असतील तर तुम्ही टोमॅटो वापरू शकता. टोमॅटो मध्ये असलेले जीवनसत्वे आणि खनिजे केसांच्या मुळांना मजबूत करण्यास मदत करतात.

चमकदार केस: बहुतेकदा रासायनिक उत्पादने किंवा हे स्ट्रेटनर आणि ड्रायरच्या अतिवापरामुळे केसांची चमक कमी होते. पण तुम्ही ती चमक परत मिळवू शकता. यासाठी टोमॅटो फायदेशीर ठरू शकतो. टोमॅटोच्या अम्लीय स्वभावामुळे केस स्वच्छ होतात त्यासोबतच केस चमकदार देखील होतात.

केस गळणे थांबवते: अनहेल्दी फूड आणि प्रदूषणामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि त्यामुळे केसांच्या गळतीसारख्या समस्या निर्माण होतात. जर तुमचेही केस गळत असतील तर तुम्ही टोमॅटोचा वापर करू शकता. टोमॅटोच्या नियमित वापरामुळे केसांचे पोषण होते आणि केस गळणे कमी होते.

पीएच संतुलन राखते: पीएच खराब झाल्यामुळे केसांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात त्यामुळे टोमॅटोचा वापर करावा. ते टाळूची पीएच पातळी संतुलित ठेवते. ज्यामुळे केस निरोगी राहण्यास मदत होते.

टोमॅटोचा वापर कसा करायचा?

टोमॅटो हेअर मास्क

दोन-तीन टोमॅटो बारीक करून पेस्ट बनवा. त्यात एक चमचा खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल टाका. ही पेस्ट टाळू पासून केसांच्या शेंड्यांपर्यंत व्यवस्थित लावा. तीस मिनिटे राहू द्या आणि नंतर सौम्य शाम्पू ने केस धुवा. हा मास्क केसांना पोषण देण्यासह केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यास मदत करतो.

टोमॅटो आणि दही पॅक

एका टोमॅटोचा रस काढा आणि त्यात दोन चमचे दही मिसळा. ते टाळूवर लावा आणि वीस ते पंचवीस मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. केसांना मॉइश्चराइज आणि कोंडा दूर करण्यासाठी हा पॅक फायदेशीर ठरू शकतो.

टोमॅटो आणि कोरफडीचा गर

टोमॅटोचा रस आणि कोरफडीचा गर समान प्रमाणात व्यवस्थित मिक्स करून टाळूची मालिश करताना ते लावा आणि वीस मिनिटांनी धुवा. हे केस मजबूत करते आणि केस गळण्यापासून थांबवते.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.