फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. तसं तर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठल्याही बहाण्याची किंवा खास दिवसाची गरज नाही. पण व्हॅलेंटाइन वीक खास मानला जातो कारण या काळात कपल्स एकत्र बसतात आणि नाते आणखी मजबूत करण्याचे आणि त्यांच्या वेळेचा आनंद घेण्याचे वचन देतात. नुकतीच व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये एका बेकरीने एक पाऊल पुढे टाकत प्रेमाचा महिना साजरा केला. यात व्हॅलेंटाइन डे स्पेशल मेन्यू सादर करण्यात आला असून केकचे नाव पाहून तुम्ही थक्क व्हाल!
ही मजेशीर पोस्ट इन्स्टाग्रामवर इमोबोइस ऑफ इंडिया नावाच्या अकाऊंटने शेअर केली आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की बेकरीचे नाव लिहिले आहे आणि खाली तुम्हाला बेकरीच्या व्हॅलेंटाइन डे स्पेशल मेनूचे रंगीत पोस्टर दिसेल.
तसं पाहिलं तर मेन्यूमधला प्रत्येक केक वेगवेगळ्या रंगांच्या नात्यांना समर्पित असतो. मेन्यूमध्ये ‘गर्लफ्रेंड केक’, ‘मेरा बाबू केक’, ‘पहला प्यार केक’, ‘एक तरफा प्यार केक’, ‘प्यार में धोका केक’, ‘केक फॉर सिंगल’ आणि ‘बॉयफ्रेंड केक’ यांचा समावेश आहे.
प्रत्येक केकच्या नावासोबतच केकची किंमत तसेच फोटोही पाहता येतो. दुकानाबाहेर जणू काही पोस्टर आहे असे वाटते. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक याबाबत सतत बोलत आहेत. यावर एका युजरने कमेंट करत लिहिलं, ‘भाईसाहेब!” तर आणखी एका युजरने लिहिलं की, ‘गर्लफ्रेंड केकपेक्षा बॉयफ्रेंड केक महाग का आहे हे मला समजत नाही.’