‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त या गिफ्ट आयडिया तुमचा आनंद करतील द्विगुणित

‘व्हॅलेंटाईन डे’ जवळ येत असल्याने सर्वांनाच ओढ लागलीय ती आपल्या प्रिय व्यक्तीकडून मिळणार असलेल्या गिफ्टची. यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला आपल्याला काय मिळणार, याची जशी उत्सुकता असते तसेच भेटवस्तू काय द्यावी, याबाबतही विचारमंथन सुरू असते.

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त या गिफ्ट आयडिया तुमचा आनंद करतील द्विगुणित
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 8:38 PM

मुंबईः प्रेमीयुगूलांसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine’s Day) हा दिवस अत्यंत खास असतो. आठवडाभर चालत असलेल्या विविध ‘डेज्‌’चे आपले एक वेगळे महत्त्व असते. शनिवारी सर्वत्र ‘हग डे’‌ (Hug day) मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अनेकांकडून आपल्या प्रिय व्यक्तीला देण्यात येत असलेल्या भेटवस्तूंबाबतही चाचपणी केली जात आहे. आपल्या जोडीदाराच्या आवडीनिवडीनुसार भेट वस्तू खरेदीला प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच काहींकडून अशा भेटवस्तूंना प्राधान्य देण्यात येत आहे, की जे आपल्या जोडीदाराच्या कायम स्मरणात राहील, किंवा त्याच्या नेहमी वापरात येईल. अनेकदा मनात असा न्यूनगंड असतो की आपण दिलेली भेटवस्तू आपल्या जोडीदाराला आवडेल की नाही, कुठली भेटवस्तू घ्यावी, असे अनेक प्रश्नांची मनात चलबिचल होत असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही गिफ्ट आयडिया (gift ideas) सांगणार आहोत, ज्या तुम्हाला मदत करतील.

प्रिंटेड मग

‘हग डे’निमित्त तुमच्या जोडीदाराला मिठी मारण्याव्यतिरिक्त तुम्ही खास भेटवस्तू म्हणून मग देऊ शकता. हे सरप्राईज गिफ्ट तुमच्या जोडीदाराला मनापासून आवडेल. मग ही नेहमी वापरात येणारी वस्तू आहे, शिवाय बराच काळ टिकत असल्याने यातून तुम्हाला आनंद मिळू शकतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्वतःचा आणि तुमच्या जोडीदाराचा असलेला फोटो मगवर प्रिंट करु शकतात.

फोटो फ्रेम

स्वत:चा फोटो हा प्रत्येकाला भावत असतोच. त्यात जर कुणी भेटवस्तू म्हणून आपणास फोटो फ्रेम दिली तर यापेक्षा दुसरा आनंद नसतो. ‘हग डे’निमित्त जोडीदाराला मिठी मारून या क्षणाची अनेक छायाचित्रे काढून त्याला संग्रहित करता येते. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी जोडीदाराला ‘हग डे’ला काढलेल्या चित्रांची फोटो फ्रेम किंवा कोलाज भेट दिल्यास हे सर्वोत्तम ठरेल. जोडीदारासोबतचे अविस्मरणीय क्षणाची छायाचित्र दिल्याने ते त्याच्या मनाला भावेल.

उशीची भेट

गेल्या काही वर्षांपासून गिफ्ट देण्यासाठी विविध प्रकारच्या प्रिंटेड उशांची क्रेझ वाढलेली आहे. लव्ह बर्ड, दिल आकारात प्रिंटेड टेक्चर, शेरोशायरीचे विविध संदेश प्रिंट असलेल्या उशांनाही मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे विविध इ- कॉमर्स साइटस्‌वर या उशा विविध पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी जोडीदाराला या भेटवस्तूचाही विचार करता येतो.

एलईडी बाटली

आपल्या जोडीदाराला जर विद्युत रोशणाईबद्दल खास आकर्षण असेल तर एलईडी बाटलीचा विचार तुम्ही करू शकतात. जोडीदाराला त्याच्या रुमसाठी एलईडी बाटली भेट देणेदेखील उत्तम पर्याय आहे. घरातील जुन्या काचेच्या बाटलीत रंगीबेरंगी एलईडी लाईट टाकून आकर्षक भेटवस्तू तयार केली जाऊ शकते.

संबंधित बातम्या

दूर आहात म्हणून काय झालं, जोडीदारासोबत असा साजरा करा ‘हग डे’

Honey | मधाचा गोडवा भावतोय? अतिसेवनामुळे शरीरावर होतात घातक परिणाम..

त्वचेच्या समस्यांवर हे घरगुती उपाय ठरतील लाभदायक, आजच ट्राय करा…

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.