Vastu dosh : रात्री झोपताना उशी खाली ठेवा या गोष्टी, अनेक समस्यांपासून मिळते मुक्ती
Vastu Tips ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की पितृदोष किंवा ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी ज्योतिषशास्त्रात सांगितलेले काही उपाय करून पाहिल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांपासून तर घरगुती त्रासातूनही आराम मिळतो.
Vastudosh : ज्योतिषशास्त्रात वेगवेगळ्या समस्यांवर वेगवेगळे उपाय सुचवले आहेत. जे एखाद्या समस्यापासून मुक्त करु शकतात. ज्योतिष शास्त्रामध्ये असे मानले जाते की उशीखाली काही वस्तू ठेवून झोपल्याने व्यक्ती जीवनातील मोठ्या समस्यांपासून मुक्ती मिळवते. अशा स्थितीत चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत.
नकारात्मक उर्जेपासून मुक्ती
एका कापडात थोडी बडीशेप बांधून रात्री झोपण्यापूर्वी ते उशीखाली ठेवा. याच्या मदतीने व्यक्तीला अनेक प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळू शकते. यासोबतच भयानक स्वप्नांची समस्याही दूर होते आणि व्यक्तीला चांगली झोप लागते. असे मानले जाते की बडीशेप दररोज उशाखाली ठेवल्यास नकारात्मक उर्जेपासून मुक्त होण्यास मदत होते.
भयानक स्वप्नांपासून मुक्ती
अनेकांना रात्री भयानक स्वप्ने पडण्याची समस्या असते. ज्यामुळे त्यांना नीट झोप येत नाही. अशा स्थितीत व्यक्तीने झोपताना उशीखाली लसणाच्या पाकळ्या ठेवाव्यात. असे केल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार कायम राहतो. तसेच, व्यक्तीला शांतपणे झोप लागते.
वाईट नजरेपासून संरक्षण
तुम्ही दररोज उशीखाली कापूर ठेवून झोपत असाल तर घरातील वास्तुदोषांपासून मुक्ती मिळू शकते. याशिवाय वाईट नजरेपासूनही या उपायाने संरक्षण मिळू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार उशीखाली कापूर ठेवल्याने व्यक्तीला नकारात्मक उर्जेपासून मुक्ती मिळते.
अस्वीकरण: ‘या लेखात दिलेली माहिती विश्वासार्हतेची हमी देत नाही. ही माहिती विविध ज्योतिषशास्त्रातील माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. कोणत्याही समस्येसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.