Hair Care : केसगळतीमुळे त्रस्त आहात? मग केसांना व्हिटॅमिन ई अशाप्रकारे लावा, होतील अनेक फायदे
नेक महिला केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. जेंव्हा केस गळायला सुरूवात होते.
मुंबई : अनेक महिला केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. जेंव्हा केस गळायला सुरूवात होते. त्यावेळी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र त्यानंतर केस गळतीची समस्या वाढते आणि हळूहळू टक्कल पडायला लागते. काही ठराविक वयानंतर केस गळणे ही सामान्य बाब आहे. पण जर तरूण वयातच केस गळती होत असेल तर याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची केस गळती कमी होण्यास मदत होईल. (Vitamin E is extremely beneficial for hair)
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, व्हिटॅमिन ई हे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असल्याने, व्हिटॅमिन ई टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढविण्यास मदत करते. हे केसांची लवचिकता वाढवते. सतत व्हिटॅमिन ई वापरल्यास आपली केस चांगली आणि चमकदार आणि निरोगी होतात.
व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल घ्या आणि त्यामध्ये तेल घाला आणि आपल्या केसांना आणि मुळांना व्यवस्थितपणे लावा शक्यतो हे तेल रात्रीच्या वेळी लावाले आणि रात्रभर केसांना ठेऊन सकाळी धुवावे. यामुळे आपल्या केसांना व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात मिळेत. हे आपण आठवड्यातून किमान दोन वेळा केले पाहिजे.
केसगळती रोखण्यासाठी व्हिटॅमिन ई आणि अंड्याचे हेअर मास्क तयार करा. हे हेअर मास्क अतिशय चांगले आहे आपल्या केसांसाठी आठवड्यातून केवळ दोनदा याचा उपयोग केल्यास तुम्हाला आपल्या केसांमध्ये कमी वेळातच चांगला फरक जाणवेल. यासाठी व्हिटॅमिन ई दोन कॅप्सूल एका अंड्यामध्ये मिक्स करायच्या आणि हे तेल आपल्या केसांना लावायचे 25 मिनिटांनंतर हे धुवायचे.
व्हिटॅमिन ई टाळूवर थेट लावणे चुकीचे आहे. याचा गंभीर परिणाम आपल्या केसांवर होऊ शकतो. व्हिटॅमिन ई आपल्याला शक्य असलेल्या तेलातच मिसळून लावायचे. मात्र, यासाठी नारळ तेल चांगला पर्याय आहे. नारळ तेल आणि व्हिटॅमिन ई मिक्स करून केसांना लावताना केसांची चांगली मालिश नेहमी केली पाहिजे. यामुळे आपले केस चांगले होण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Skin Care | सकाळी उठताच थंड पाण्याने धुवा चेहरा, चिरकाळ टिकून राहील त्वचेचे तारुण्य!https://t.co/BxDSd3vEDs#beautytips #skincareroutine #ColdWater
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 9, 2020
(Vitamin E is extremely beneficial for hair)