हाडे फ्रॅक्चर होऊ नये म्हणू आवश्यक असते व्हिटामिन के, जाणून घ्या कोणत्या गोष्टींपासून मिळते

व्हिटामिन के आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. अनेकांना याची माहिती नसते. कोणत्या गोष्टींचा समावेश केल्याने व्हिटॅमिन के आपल्या शरिराला मिळते. याचे चांगले स्त्रोत कोणते आहेत. यामध्ये आपण जाणून घेऊयात की व्हिटॅमिन के मिळविण्यासाठी कोणत्या गोष्टींना आहाराचा भाग बनवता येईल.

हाडे फ्रॅक्चर होऊ नये म्हणू आवश्यक असते व्हिटामिन के, जाणून घ्या कोणत्या गोष्टींपासून मिळते
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 6:44 PM

Vitamin K : व्हिटॅमिन के आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. शरीराला निरोगी राहण्यासाठी ते खूप आवश्यक आहे. व्हिटॅमिन के मुळे हाडांची घनता टिकवून राहते. व्हिटामिन के मुळेच हाडांचे आजार होण्याची शक्यता कमी करते. हाडांचे फ्रॅक्चरला देखील ते प्रतिबंध करते. व्हिटॅमिन के हे हृदयाच्या आरोग्यासाठी ही फायद्याचे असते. आपल्या आहारात तुम्ही कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे व्हिटामिन के ची कमतरता भरुन निघेल.

पालक

पालक हा व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत आहे. पालकमध्ये बीटा कॅरोटीन असते जी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवते. व्हिटॅमिन के शिवाय पालकमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई देखील असते. यात अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात जे आरोग्याची काळजी घेतात.

ड्रायफ्रुट्स

अक्रोड, पाइन नट्स, हेझलनट्स आणि काजूमध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. हे ड्राय फ्रूट खाल्ल्याने हाडांचे आरोग्य सुधारते. तसेच ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर फायबर असते आणि ते पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम देतात.

अंडी

अंडे हे सुपरफूड आहे. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. अंडी प्रथिने आणि व्हिटॅमिन डीचा एक चांगला स्रोत आहे. पण यामध्ये व्हिटॅमिन के देखील चांगले असते. अंडी सहजपणे आहाराचा एक भाग बनवता येतात. सहसा सकाळी नाश्त्यात ते खाल्ले पाहिजे.

ब्रोकोली

हिरव्या भाज्यांमध्ये ब्रोकोली देखील खूप फायदेशीर असते. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि व्हिटॅमिन के आढळतात. रोज एक कप शिजवलेली ब्रोकोली खाल्ल्यास शरीराला दैनंदिन गरजेच्या ९२ टक्के व्हिटॅमिन के मिळते.

एवोकॅडो

व्हिटॅमिन के जर हवे असेत तर एवोकॅडोचा तुम्ही आहारात समावेश केला पाहिजे. मध्यम आकाराचा एवोकॅडो खाल्ल्याने शरीराला दैनंदिन गरजेच्या 20 टक्के व्हिटॅमिन के मिळते. त्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात, फायबर देखील असतात. ब्रोकोली सॅलड्स, सँडविच आणि स्मूदीमध्ये घालून खाऊ शकतो. तसेच तुम्ही ऑम्लेट, भाज्या किंवा पराठ्यातही टाकून ते खाऊ शकता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.