रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, व्हिटॅमिन ए, सी आणि डी महत्वाचे, वाचा कशातून मिळते ‘हे’ व्हिटॅमिन !

कोरोनाच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष करून कोरोनापासून दूर राहिचे असेलतर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली पाहिजे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, व्हिटॅमिन ए, सी आणि डी महत्वाचे, वाचा कशातून मिळते 'हे' व्हिटॅमिन !
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 7:02 AM

मुंबई : कोरोनाच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष करून कोरोनापासून दूर राहिचे असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली पाहिजे. यासाठी आपण आहार आणि व्यायाम याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, व्हिटॅमिन ए, सी, डी, ईसह आहारात जस्त आणि सॅलिनियमयुक्त पोषक घटकांचा समावेश करा. अँटी-ऑक्सिडंट शरीर खराब होण्यापासून प्रतिबंधित करते. (Vitamins A, C and D are beneficial for boosting the immune system)

प्रत्येक फळामध्ये काही खास गुणधर्म असतात, ज्याचे आपल्या आरोग्यासाठी लाभदायी फायदे असतात. यापैकी एक फळ म्हणजे पपई. पपई खूप सहज उपलब्ध होणारे फळ आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते. पपईचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून आराम मिळतो. पपई दररोज निश्चित प्रमाणात खाऊ शकतो. पेरु हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरु त्वचा, शरीर आणि केसांसाठी खूप चांगले आणि पौष्टिक फळ आहे.

पेरू हा व्हिटॅमिन ए सीचा मोठा स्त्रोत आहे. ज्यांना गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी पेरु खावीत. याशिवाय पेरु रक्त शुद्ध करण्याचे कामही करतात. शिमला मिरची खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामध्येही लाल शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते. ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता त्यांनी दिवसातून किमान एकदा तरी लाल शिमला मिरची खावी.

लाल शिमला मिरचीमध्ये जीवनसत्त्वे सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर आणि बीटा कॅरोटीन यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. लाल शिमला मिरचीमध्ये कॅलरी मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही. व्हिटॅमिन सीचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत होते. यामुळे आहारात जास्त-जास्त लाल शिमला मिरचीचा समावेश करा.

फणस हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. फणस हे चवदार तर आहेतच शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. फणस हे भाजी आणि फळ म्हणून वापरले जाते. यात व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियमचे असे भरपूर गुणधर्म आहेत फणस खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती देखील वेगाने वाढते.दररोज फणस खाल्लाने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. फणस उच्च रक्तदाब कमी करण्यास खूप उपयुक्त आहे. नियमितपणे फणस खाल्लाने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

संत्रा, किवी, हिरव्या आणि लाल शिमला मिरची, केळी, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, पालक, पपई, अननस, लिंबू आणि आंबा इत्यादींमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी एक अँटिऑक्सिडेंट आहे जे कनेक्टिव टिश्यूजला चांगले बनवते आणि सांध्याला सपोर्ट देण्याचे कार्य करते. याव्यतिरिक्त, हे कोलेजन, एल-कॅरनिटिन आणि शरीरातील काही न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यास उपयुक्त आहे. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…

(Vitamins A, C and D are beneficial for boosting the immune system)

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.