या घरगुती उपायांनी काळ्या ओठांची समस्या होईल दूर!
गुलाबी ओठ असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. ओठांचं सौंदर्य, चेहऱ्याच्या सौंदर्याला आणखी वाढवतं. अनेक जणांना काळ्या ओठांची समस्या असते. पण लोकांचा गोंधळ उडतो की नेमकं या समस्येचं करायचं काय. मग अनेक गोष्टी यासाठी वापरल्या जातात. त्या फेल गेल्या कि काहीतरी वेगळंच होतं. हे घरगुती उपाय एकदा बघा, याने तुम्हाला नक्कीच फरक पडेल.
मुंबई: सौंदर्य वाढवण्यासाठी मुली विविध प्रकारचे क्रीम, घरगुती उपाय करून पाहतात. डोळे, नाक, कान आणि गालांप्रमाणेच ओठही खूप महत्त्वाचे असतात. त्यांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागते. तुमच्या लक्षात आलं असेल तर काही लोकांचे ओठ काळे दिसतात. मात्र, यामागे काही कारणे असू शकतात. काळ्या ओठांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. अशावेळी ओठ मऊ आणि गुलाबी करण्यासाठी तुम्ही बाजारातील काही क्रीम वापरू शकता. पण आज आम्ही तुम्हाला काही घरगुती आणि देसी रेसिपी सांगणार आहोत ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या ओठांना नॅचरल पिंक लुक देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया ओठ गुलाबी करण्याची घरगुती उपाय…
या घरगुती उपायांनी काळे ओठ गुलाबी करा
काकडी
ओठांवर काळी वर्तुळे किंवा काळे डाग असतील तर घरगुती उपायांमध्ये काकडीचा वापर करू शकता. खरं तर काकडी त्वचेला हायड्रेट करते. ताज्या काकडीचे तुकडे अर्धा तास ओठांवर ठेवा. यामुळे तुमचे ओठ काही दिवसांतच नॅचरल लुकमध्ये येऊ लागतील. काकडीत अँटीऑक्सिडंट्स आणि सिलिका युक्त संयुगे असतात, ज्यामुळे ओठांचा काळेपणा दूर होतो.
बीटरूट
ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी बीटरूट खूप प्रभावी आहे. याचा वापर केल्याने तुमचे काळे ओठ काही दिवसांतच गुलाबाच्या पाकळ्यांसारखे मुलायम होतील. आपल्या ओठांना नैसर्गिक लुक देण्यासाठी, बीटरूट सोलून किसून घ्या. नंतर ते ओठांवर लावा. साधारण 15 ते 20 मिनिटांनी ओठ पाण्याने धुवून घ्यावेत.
कोरफड जेल
कोरफड जेल त्वचेसाठी वरदान मानले जाते. कोरफडीच्या वापरामुळे त्वचेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येमध्ये बरेच फायदे मिळतात. त्याचप्रमाणे ओठ गुलाबी होण्यासाठीही उपयुक्त ठरते. गुलाबी ओठांसाठी ही एक उत्तम घरगुती रेसिपी आहे. कोरफड ओठांचा काळापणा खूप लवकर दूर करते. कोरफड जेल घेऊन ओठांवर चांगला मसाज करा. रात्री झोपण्यापूर्वीही तुम्ही हे लावू शकता. सकाळी उठून पाण्याने चेहरा धुवावा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)