नाचणी ते अक्रोड, चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी उपयुक्त टिप्स
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय केले जातात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.
मुंबई : त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय केले जातात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. मात्र, त्यापेक्षाही महत्वाचे आहे त्वचेची काळजी घेणे सर्वांनाच आपली त्वचा निरोगी आणि चमकणारी हवी असते. परंतु व्यस्त वेळापत्रकांमुळे बहुतेक लोक त्वचेची काळजी घेऊ शकत नाहीत. (Want radiant and beautiful skin then follow these tips)
त्यामुळे आपली त्वचा कोरडी, डोळे सुजलेले, सुरकुत्या, मुरुम आणि डाग चेहऱ्यावर दिसू लागतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या त्वचे संदर्भातला अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. त्वचा चांगली ठेवण्यासाठी चेहऱ्याला स्क्रब करणे आवश्यक असते. यासाठी नाचणीमध्ये दही मिसळा. नाचणीचे हे मिश्रण चेहर्यावर लावा आणि सुमारे 15 ते 25 मिनिटांनंतर ते पाण्याने धुवा.
आपण कधीही हा स्क्रब वापरू शकता. हा स्क्रब तुमची त्वचा एक्सफोलीएट करतो आणि त्वचा मॉइश्चराइझ देखील करतो. स्क्रबमध्ये उपस्थित दही सन टॅन काढून टाकण्यास मदत करते. याशिवाय, नाचणीमध्ये अमीनो आम्ल असतात, जे आपल्या त्वचेचे कोलेजन वाढवण्यास तसेच, त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करतात. त्वचेसाठी सैंड मास्क वापरणे देखील फायदेशीर आहे. आपण हा मास्क आपण दररोज वापरू शकता.
तुम्हाला शक्य असेल तर मास्कमध्ये कोरफड जेल, व्हिटॅमिन ई, जोजोबा तेल आणि सूर्यफूलाच्या बियांचा देखील समावेश करू शकता. यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार बनवेल. सैंड मास्क त्वचेसाठी चांगला आहे. बहुतेक सैंड मास्क त्वचा स्वच्छ करण्याचे तसेच शुद्ध करण्याचे काम करतात. शक्यतो रात्रीच्या वेळी सैंड मास्क वापरला पाहिजे. आपल्याला चांगली त्वचा पाहिजे असले तर रात्री झोपण्यापूर्वी नाईट क्रीमचा वापर करा.
अक्रोडमध्ये ओमेगा-3 हा घटक असतो, जो त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करतो. अक्रोड ही स्कीन स्क्रबसाठी वापरला जाणारा मुख्य घटक आहे. ज्याचा वापर केल्याने आपली त्वचा चमकदार दिसते. याव्यतिरिक्त, अक्रोड त्वचा हायड्रेटेड आणि मॉइश्चराइझ ठेवते. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन-ई असते, जे टाइप -2 मधुमेहापासून तुमच्या शरीराचे रक्षण करते. अक्रोड हृदयरोगासाठी देखील खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
अक्रोड केवळ आपली साखर नियंत्रित ठेवत नाही तर, कोलेस्टेरॉलची पातळीही कमी करते. पाच चमचे दही, दोन चमचे बदाम किंवा ऑलिव्ह तेल, एक ग्लास गरम पाणी, एक सूती रुमाल सर्वप्रथम, बदाम तेल दहीमध्ये मिसळा आणि चमच्याने चांगले मिक्स करा तयार केलेले मिश्रण आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 10 ते 15 मिनिटांसाठी मालिश करा. यानंतर, एक सूती रुमाल कोमट पाण्यात भिजवून चेहरा स्वच्छ करा. हे तुम्ही आठवड्यातून दोनदा केले तर चेहऱ्यावरील काळपट पणा, मुरूम, काळे डाग यांसारखे अनेक समस्या दूर होतील.
संबंधित बातम्या :
Immunity Booster | थंडीच्या काळात ‘या’ पदार्थांचे सेवन करा आणि इम्युनिटी वाढवा!https://t.co/OaOpxZW9YG#immunityboosters #VitaminC #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 27, 2020
(Want radiant and beautiful skin then follow these tips)