वजन कमी करायचे आहे ? तर दुपारच्या जेवणात करा या पदार्थांचा समावेश

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात लोक अनेकदा स्वतःच्या शरीराला इजा करतात. आहार तज्ञ म्हणतात की वजन कमी करणे म्हणजे जास्त वेळ उपाशी राहणे असा होत नाही. आपल्या जेवणात जीवनसत्वे आणि प्रथिने असलेल्या पदार्थांचा समावेश करणे वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे.

वजन कमी करायचे आहे ? तर दुपारच्या जेवणात करा या पदार्थांचा समावेश
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 9:00 AM

लठ्ठपणामुळे अनेक आजार होऊ शकतात. निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी वजनाचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. मात्र लठ्ठपणाची समस्या सहजासहजी कमी करता येत नाही यासाठी आहारासोबतच व्यायामाचे काटेकोर नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. वजन कमी करणे म्हणजे कॅलरीजची संख्या कमी करणे. आहार तज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. विशेषतः तुम्ही दुपारच्या जेवणात भरपूर जीवनसत्वे, प्रथिने आणि फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. लठ्ठपणा कमी करायचा असेल तर दुपारच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे तज्ञांनी सांगितले आहे. जाणून घेऊया कोणते आहे ते पदार्थ.

धान्य

तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणात ब्राऊन राईस, क्विनोआ, ओट्स आणि दलिया यांचा समावेश करू शकता जे जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात. ब्राऊन राईस मध्ये भाज्या मिसळून तुम्ही पुलाव तयार करून खाऊ शकता.

प्रथिनेयुक्त पदार्थ

प्रथिने युक्त पदार्थ स्नायू मजबूत करण्यास मदत करतात. हे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि पोटही बऱ्याच वेळ भरलेले राहते. दुपारच्या जेवणात तुम्ही मुगडाळ, टोफू, हरभरा, राजमा, मसूर, चिकन आणि अंडी खाऊ शकता.

हिरव्या पालेभाज्या आणि फळे

हिरव्या पालेभाज्या आणि फळे हे आरोग्यदायी पदार्थांमध्ये गणले जातात. यामध्ये खूप कमी कॅलरीज आहेत जे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करणाऱ्या लोकांसाठी एक योग्य पर्याय आहे. याच्या सेवनाने तुम्हाला आवश्यक जीवनसत्वे, खनिज आणि फायबर मिळतात. जे पचन संस्था निरोगी ठेवतात. काकडी, गाजर, टोमॅटो आणि सिमला मिरचीचा आहारात समावेश केला जावू शकतो.

स्वतःला हायड्रेट ठेवा

वजन कमी करण्याच्या प्रवासात तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे असे तज्ञांचे मत आहे. तुम्ही स्वतःला जेवढे हायड्रेट ठेवाल तेवढे जास्त फायदेशीर ठरेल. चयापचय वाढवण्यासोबतच शरीरातील विषारी पदार्थ ही बाहेर काढले जातात. वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.