फॅन्सी ब्रा ते रेनकोट… वॉशिंग मशीनमध्ये या’ 6 गोष्टी कधीच धुवू नयेत; क्वालिटी तर जातेच पण…
वॉशिंग मशीन आज प्रत्येक घरात आहे, पण सर्वकाही त्यात धुतले जाऊ शकत नाही. वूलनची टोपी, मोती-सिप्पी असलेले कपडे, तेल-पेट्रोलचे डाग असलेले कपडे, रेनकोट, लेसचे कपडे आणि फॅन्सी ब्रा हे वॉशिंग मशीनमध्ये धुण्याने खराब होऊ शकतात. या वस्तू हाताने धुतल्यास त्या टिकून राहतात.
शहरापासून खेड्यापर्यंत आजकाल प्रत्येक घरात वॉशिंग मशीन आले आहे. वॉशिंग मशीनमध्ये अगदी कपड्यांपासून गोधड्यांपर्यंत धुतल्या जातात. इतकेच नाही तर घरातील पायपुसणे आणि बुटंही वॉशिंग मशीनमध्येच धुतले जातात. पण प्रत्येक गोष्ट ही वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुण्यासारखी नसते. काही गोष्टी या हातानेच धुण्यासारख्या असतात. वॉशिंग मशीनमध्ये टाकल्यावर त्या खराब होतात किंवा त्यांची क्वॉलिटी जाते. त्यामुळे कोणत्याही वस्तू वॉशिंग मशीनमध्ये धुवू नका. त्यातल्या त्यात सहा गोष्टी तर वॉशिंग मशीनपासून लांबच ठेवा.
१. वूलनची टोपी
तुम्ही मशीनमध्ये वूलनची टोपी धुतली तर ती खराब होऊ शकते. ही टोपी मऊ असते. त्यामुळे ती हॅण्ड वॉशच केली पाहिजे. तसेच, टोपीचे कापसाचे तंतू खराब होऊ नये म्हणून माइल्ड डिटर्जंट वापरावा.
२. सिप्पी-मोती असलेले कपडे
ज्या कपड्यांवर सिप्पी, मोती किंवा सिक्विनचे काम असते, ज्या कपड्यांवर नक्षीदार काम असते, त्या कपड्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुण्यापासून दूर ठेवावे. मशीनमध्ये फिरवल्याने सिप्पी किंवा मोती पडू शकतात आणि त्यांचे धागे तुटून कपड्यांचा रूप खराब होऊ शकतो.
३. गॅसोलीन, कुकिंग ऑईल किंवा अल्कोहोलचे डाग
कपड्यांवर गॅसोलीन, कुकिंग ऑईल, अल्कोहोल किंवा मोटर ऑईलचे डाग असल्यास, त्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुणे टाळा. या प्रकारच्या डागांमुळे आग लागण्याचा धोका असतो.
४. रेनकोट
रेनकोट वॉटरप्रूफ असतात आणि मशीनमध्ये टाकल्याने ते फुगतात. यामुळे रेनकोट फाटण्याचा धोका अधिक असतो. शिवाय रेनकोट आत फाटल्यास मशीनला देखील हानी होऊ शकते.
५. लेस असलेले कपडे
लेस असलेले कपडे नाजूक असतात आणि मशीनमध्ये वारंवार फिरवल्यामुळे ते खराब होऊ शकतात. म्हणून, लेस असलेले कपडे हाताने, खूप काळजीपूर्वक धुवावे.
६. फॅन्सी ब्रा
महागड्या, फॅन्सी, लेस किंवा पॅडेड ब्रा वॉशिंग मशीनमध्ये धुणे टाळा. विशेषतः जर ती अंडरवायर ब्रा असेल तर. मशीनमध्ये ती खराब होण्याची शक्यता जास्त असते आणि ब्राचा आकार किंवा कटीत बदल होऊ शकतो.