कलिंगड लाल अन् गोड आहे की नाही? कसं ओळखाल? फक्त ‘या’ ३ ट्रिक्स करा फॉलो तुम्ही कधीच फसणार नाही
टरबूज किंवा कलिंगड नेहमी त्याच्या वजनानुसार घेतले जाते. पण तुम्ही कलिंगड खरेदी करताना कधी फसला आहात का? विकणाऱ्याने तुम्हाला सांगितले असेल कलिंगड आतून लाल आहे पण ते पांढरं निघालं आहे का? असं होत असेल तर आता या ट्रिक्स करा फॉलो

सध्या उन्हाळा सुरू झाला असून प्रत्येक जण उन्हाच्या कडाक्याने हैराण झाले आहे. अशातच उन्हाळ्याच्या दिवसात सर्वच जण कलिंगड किंवा टरबूज खाणं पसंत करतात. कलिंगड हे एक असे फळ आहे जे सर्वांना आवडते. पण कलिंगड कसं खरेदी करायचं हे सर्वांनाच माहिती नसते. यामध्ये अनेक लोकं बऱ्याचदा फसतात. त्यामुळे योग्य कलिंगड खरेदी करण्यासाठी या काही खास ट्रिक्स तुम्ही नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत.
बरेच जण बाजारातून कलिंगड खरेदी केल्यानंततर घरी आणून त्याला कापतात मात्र तेव्हा आपले पैसे वाया गेले असे बऱ्याचदा वाटते. कारण ते कलिंगड आतून लाल नसतं आणि खाण्यास पूर्णतः बेचव निघतं. पण आता टेन्शन घ्यायचं काही कारण नाही… आज आम्ही तुम्हाला कलिंगड खरेदी करण्यापूर्वीच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत त्या तुम्ही नक्की फॉलो करायला हव्यात.
1. कलिंगडचे वजन नीट तपासा
चांगलं कलिंगड हे नेहमी वजनाने भारी असते. जर कलिंगड हलकं असेल तर ते आतून पोकळ किंवा पांढर असण्याची शक्यता असते. जेव्हाही तुम्ही कलिंगड खरेदी करायला जाल तेव्हा त्याचे वजन योग्य आहे की नाही ते तपासून मगच कलिंगडची निवड करा. गोड आणि लाल कलिंगड त्याच्या आकाराच्या मानाने वजनदार असते. ते वजनदार असण्याचे कारण म्हणजेच ते रसाळ असते.
2. कलिंगडचा रंग आणि पोत तपासा
चांगल्या कलिंगड किंवा टरबूजचा रंग हा एकसारखा आणि चमकदार असतो. जर कलिंगडाचा रंग एकसारखा नसेल किंवा वेगवेगळे डाग त्यावर असतील तर ते आतून खराब निघू शकते. तसेच, कलिंगडची पोत तपासा. बऱ्याचदा कलिंगड घेताना विक्रेता त्यावर हात आपटून त्याच्या आवाजावरून ते चांगलं आहे की नाही हे आपल्याला सांगतो. कारण चांगलं कलिंगड हे नेहमी वरच्या बाजूने थोडसं जाडसर असते.
३. पिवळा डाग आहे का ते बघा
जर तुम्ही कलिंगड खरेदी करताना बारकाईने पाहिले तर त्यावर एक पिवळा डाग तुम्हाला दिसेल. जर कलिंगडवर हा पिवळा डाग असेल तर ते व्यवस्थित पिकलं आहे आणि आतून लाल असते. कारण हा डाग कलिंगड शेतात असताना सूर्यप्रकाशामुळे त्यावर पडतो. जर तुम्ही कलिंगड खरेदी करायला गेलात आणि त्यावर पिवळा डाग असेल तर ते आतून गोड आणि लाल असल्याचं लक्षण मानले जाते.