Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकं लग्नासाठी सर्वात जास्त पैसे कशावर खर्च करतात? पाहा संपूर्ण यादी

लग्नात सर्वात जास्त पैसे कुठे खर्च होतात, याच्याशी देखील एक मोठा प्रश्न जोडला जातो. जर तुम्हीही लग्नाचा प्लॅन करत असाल आणि यात तुमचे बजेट देखील मर्यादित असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.

लोकं लग्नासाठी सर्वात जास्त पैसे कशावर खर्च करतात? पाहा संपूर्ण यादी
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 6:35 PM

दिवाळी झाल्यानंतर आता लग्नसराईला सुरुवात होणार आहे. आपल्या भारतात लग्नाची एक वेगळीच क्रेझ आहे. लग्न हा एक मोठा कौटुंबिक आणि मित्रपरिवारांसोबत विवाह सोहळा साजरा केला जातो. नुकतेच आता राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचे लग्न पार पडले असून त्यांच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांना दिलेल्या गिफ्ट्सची तसेच कपडे , दागिने यामुळे त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली होती.

नवीन वर वधू त्यांच्या लग्नात सर्वात जास्त खर्च करून आपला आनंद हा द्विगुणित करतात. पण या सेलिब्रेशनसोबत लग्नात सर्वात जास्त पैसे कुठे खर्च होतात, याच्याशी देखील एक मोठा प्रश्न जोडला जातो. जर तुम्हीही लग्नाचा प्लॅन करत असाल आणि यात तुमचे बजेट देखील मर्यादित असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की लग्नासाठी सहसा सर्वात जास्त खर्च कोठे होतो आणि आपण हे खर्च कसे कमी करू शकता.

लग्नामध्ये सर्वात जास्त खर्च कुठे होतो?

लग्नात अनेक प्रकारचे खर्च होतात, पण काही गोष्टींसाठी सर्वात जास्त खर्च केला जातो. जाणून घेऊया काय आहे ते.

लग्नाचे स्थळ

लग्नात सर्वात जास्त खर्च हा लग्नाचे लोकेशन यावर केला जातो. यामध्ये जागेचे भाडे, त्यामध्ये केली जाणारी सजावट, साउंड सिस्टीम आणि प्रत्येकाच्या आवडी निवडीनुसार यात इतर गोष्टींचा समावेश केला जातो.

जेवणाचा खर्च

लग्नसमारंभ म्हंटल कि यात जेवण आलंच. यामध्ये आपण जस जसे पदार्थ वाढवत जाणार तसतसे त्याचे पैसे देखील वाढले जातात. त्यात आता नवीन म्हणजे जेवण असलेल्या ठिकाणी देखील अनेकजण सजावट करतात ज्याने तेथील वातावरण प्रसन्न राहते. यासर्वांचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात होतो.

लग्नाचे कपडे

प्रत्येक वधू आणि वराचे त्यांच्या लग्नात कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करता येतील याचे एक स्वप्न असते. त्यामुळे वधू-वरांचे कपडे, दागिने आणि अॅक्सेसरीजवरही बराच पैसा खर्च केला जातो.

पाहुण्यांसाठी भेटवस्तू

आपल्या भारतीय लग्नसमारंभात लग्नात आलेल्या पाहुण्यांचे यथाचित्त स्वागत करून त्यांना अनेक प्रकारचे भेटवस्तू दिल्या जातात. त्यामुळे पाहुण्यांना भेटवस्तू देण्यावरही बराच खर्च होतो.

फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी

लग्नामध्ये झालेल्या कार्यक्रमाचे अविस्मरणीय क्षणांची आठवण म्हणून फोटो काढले जातात आणि व्हिडिओ देखील बनवला जातो. यासाठी देखील एक फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफरची नेमणूक करावी लागते, ज्यासाठी खूप पैसे खर्च होतात.

संगीत आणि मनोरंजन

लग्न म्हंटल कि त्यात संगीत, हळदीचा कार्यक्रम आणि लग्नाचा सोहळा हे कार्यक्रम येतात. यात तीन ते चार दिवस सतत डीजे, बँड, लावला जातो. त्यामुळे डीजे आणि बॅण्डवर देखील अमाप पैसा खर्च केला जातो.

निमंत्रण पत्रिका

अनेक वधुवर त्यांच्या आवडीनुसार लग्नाची पत्रिका तयार करतात. त्यामुळे लग्नपत्रिका यावर सुद्धा खूप खर्च केला जातो.

वाहतूक

अनेक वधुवर हे त्याच्या आवडत्या ठिकाणी लग्नाचे आयोजन करून लग्न सोहळा पार पाडतात. अशा वेळेस पाहुण्यांसाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यावरही खर्च केला जातो.

हनीमून

लग्नानंतर हनिमूनला जाण्यासाठी बजेटवर अधिक खर्च केला जातो.

वरील लिस्टप्रमाणे कुठल्याही लग्नात हा नेहमीचा खर्च असतो तरी देखील हाच प्रश्न आहे कि सगळ्यात जास्त खर्च कुठे होतो. तर सर्वाधिक खर्च हा आपण बुक केलेल्या लग्नाच्या हॉलचा तसेच त्यात केली जाणारी सजावट म्हणजे मंडप आणि लग्नात आलेल्या पाहुण्यांसाठी वेलकम ड्रिंक पासून ते जेवणापर्यंत सर्वाधिक खर्च होतो.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.