Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss | कॅलरी कमी करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, लठ्ठपणा देखील होईल कमी!

वजन कमी करणे हा सर्वात चर्चित विषयांपैकी एक आहे. अनेक वेळा झटपट परिणाम मिळवण्यासाठी लोक आहाराकडे नीट लक्ष देत नाहीत. पण, व्यायामाबरोबरच योग्य मार्गाने वजन कमी करण्यासाठी निरोगी आहार खूप महत्वाचा आहे.

Weight Loss | कॅलरी कमी करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, लठ्ठपणा देखील होईल कमी!
Weight Loss
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 5:24 PM

मुंबई : वजन कमी करणे हा सर्वात चर्चित विषयांपैकी एक आहे. अनेक वेळा झटपट परिणाम मिळवण्यासाठी लोक आहाराकडे नीट लक्ष देत नाहीत. पण, व्यायामाबरोबरच योग्य मार्गाने वजन कमी करण्यासाठी निरोगी आहार खूप महत्वाचा आहे. यासाठी दैनंदिन दिनक्रमात लहान-सहान बदल करून देखील वजन कमी करू शकता. आहारात काही आवश्यक ते बदल करून कॅलरीचे प्रमाण कमी करू शकता. साखर आणि कॅलरीज काही गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात असतात, जे वजन कमी करण्याच्या ध्येयातील समस्या वाढवण्याचे काम करतात. साखर आणि कॅलरीजचे सेवन टाळण्यासाठी दैनंदिन दिनचर्या बदलून कोणत्या गोष्टी टाळता येतील ते जाणून घेऊया.

डाएट सोडाऐवजी कैरी पन्हे प्या!

सोड्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि त्यात कॅलरीज नसतात. हे एक कृत्रिम पेय आहे. याचे सेवन केल्याने वजन वाढते. याशिवाय पोटाच्या समस्या देखील वाढतात. उन्हाळ्यात शरीरातील निर्जलीकरण टाळण्यासाठी कैरीच्या पन्ह्याचे सेवन करा. हे सहज घरातील वस्तूंपासून बनवता येते.

पेस्ट्रीऐवजी दुधीची खीर खा

पेस्ट्रीमध्ये पीठ, साखर आणि ट्रान्स फॅट भरपूर प्रमाणात असते. जर, तुम्हाला गोड खायचेच असेल तर दुधीची खीर खा. दुधीमध्ये भरपूर फायबर असते. दुधी भोपळ्यात दूध घातल्याने प्रथिनांचे प्रमाण वाढते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही खीर खूप फायदेशीर आहे, कारण त्यात ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे. यामध्ये तुम्ही ड्राय फ्रूट्स घालू शकता.

घरगुती चटणी खा

सॉसमध्ये साखर, मीठ आणि अनेक प्रकारची हानिकारक चरबी असते. म्हणूनच, याऐवजी तुम्ही घरी चटणी बनवा आणि तीच खा. घरगुती चटणी ही आरोग्यदायी असते, जी पाचन तंत्र सुधारण्यास मदत करते. तसेच आपले चयापचय सुधारते.

इन्स्टन्ट फूडऐवजी शिजवलेले अन्न खा

अधिक लोकांना पहाटे झटपट बनलेले पदार्थ खाणे आवडते. पण ते खाण्यासाठी निरोगी आहेत का? झटपट तयार होणाऱ्या पदार्थामध्ये साखर, मीठ आणि रसायने असतात. तर व्यवस्थित शिजवलेल्या अन्नामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पोट बराच वेळ भरून ठेवते. फायबरच्या अधिक सेवनामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

बाजारातील बटरऐवजी घरीच बनवा लोणी

आहारात निरोगी चरबी असणे खूप महत्वाचे आहे. मार्केटमध्ये मिळणाऱ्या बटरमध्ये ट्रान्स फॅट्सचे प्रमाण जास्त असते. सोडियम देखील यामध्ये खूप असते. त्याच वेळी, होममेड बटरमध्ये अर्थात लोण्यात निरोगी चरबी असते, जी पोटावरची चरबी कमी करण्यास मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Weight loss tips Include ‘these’ things in your diet to reduce calories)

हेही वाचा :

Health Tips | शुद्ध तूप आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या याबद्दल अधिक…

चिकट केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ हेअर मास्क केसांना लावा आणि समस्या दूर करा!

'वाघ्या कुत्रा फेकून द्या, ऐवढ्या लांब कानाचं..' उदयनराजे पुन्हा भडकले
'वाघ्या कुत्रा फेकून द्या, ऐवढ्या लांब कानाचं..' उदयनराजे पुन्हा भडकले.
600 मीटरचा रस्ता अन् अजितदादा - सुप्रियाताईंचं शाब्दिक युद्ध
600 मीटरचा रस्ता अन् अजितदादा - सुप्रियाताईंचं शाब्दिक युद्ध.
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील.
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत.
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली.
प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचे मिश्किल टोले
प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचे मिश्किल टोले.
टायगर अभी जिंदा है.., एकनाथ शिंदेंकडून शहाजीबापू पाटलांचं कौतुक
टायगर अभी जिंदा है.., एकनाथ शिंदेंकडून शहाजीबापू पाटलांचं कौतुक.
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.