Weight Loss | डाएटिंगच्या नादात खाणे-पिणे विसरू नका, ‘या’ प्रकारे करा वजन नियंत्रित!

आजकाल लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. आपणास जवळजवळ प्रत्येक घरात लठ्ठपणाने त्रस्त असलेले लोक सापडतील. यामागील खरे कारण म्हणजे आजची चुकीची आहार पद्धती आणि वाईट जीवनशैली. लठ्ठपणामुळे शरीरात अनेक प्रकारचे रोग आपोआप उद्भवतात.

Weight Loss | डाएटिंगच्या नादात खाणे-पिणे विसरू नका, ‘या’ प्रकारे करा वजन नियंत्रित!
वाढलेले वजन
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 7:09 AM

मुंबई : आजकाल लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. आपणास जवळजवळ प्रत्येक घरात लठ्ठपणाने त्रस्त असलेले लोक सापडतील. यामागील खरे कारण म्हणजे आजची चुकीची आहार पद्धती आणि वाईट जीवनशैली. लठ्ठपणामुळे शरीरात अनेक प्रकारचे रोग आपोआप उद्भवतात. तथापि, लोक आता लठ्ठपणाचे तोटे समजून घेऊ लागले आहेत आणि लठ्ठपणा टाळण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करतात (Weight loss tips to manage your weight instead of dieting).

काही लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी डाएटिंगचा आधार घेतात आणि डाएटिंगच्या नावाखाली ते पुरेसे अन्नदेखील खात नाहीत. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का की, भुकेल्यामुळे पोटाची लठ्ठपणा वाढतो. कारण, अशा परिस्थितीत शरीरात चरबी जास्त प्रमाणात साठवली जाते. जर, आपल्याला खरोखर वजन कमी करायचे असेल तर खाणे पिणे थांबवू नका. त्याऐवजी आपल्या आहाराचे व्यवस्थापन करण्यास शिका. ज्याद्वारे आपले वजन देखील कमी होऊ शकते आणि शरीराला ऊर्जा देखील मिळते.

  1. काही लोकांना अशी सवय असते की, जेव्हा जेव्हा ते काही खायला बसतात तेव्हा ते एकत्र खूप अन्न खातात. मग, दिवसभर काहीही खावेसे वाटत नाही. असे करू नका, त्याऐवजी दिवसभर थोडे थोडे अन्न खा. दर दोन तासांनी काहीतरी खाणे सुरु ठेवा.
  2. दोन ग्लास कोमट पाणी पिऊन आपल्या दिवसाची सुरुवात करा. त्यानंतर थोड्या वेळाने चहाऐवजी ग्रीन टी किंवा लेमन टी प्या. लेमन टीमध्ये साखरेऐवजी मध वापरा.
  3. न्याहरीत अंकुरलेले धान्य, टोफू, सोया दूध, सोयाबीन आणि उकडलेले अंडी इत्यादी उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ घ्या.
  4. दर दोन तासानंतर एखादे फळ खा. नेहमी हंगामी फळे घ्या. टरबूज, खरबूज, लीची, मोसंबी, संत्रे, सफरचंद, केळी, आलू बुखारा इत्यादी तंतुमय फळे खा.
  5. अन्नामधील कार्ब्सचे प्रमाण कमी करा. यासाठी आहारात दोन चपाती, डाळ, भाजी इत्यादी पदार्थ घ्या. भात खाणे टाळा. आपण इच्छित असल्यास, आठवड्यातून एकदा थोडासा भात खाऊ शकता. आहारात दही आणि आठवड्यातून एकदा खिचडी खा.
  6. अधिकाधिक द्रव आहार घ्या. दोन तास खाल्ल्यानंतर नारळाचे पाणी, ताक, रस इत्यादी पेय प्या.
  7. हलका नाश्ता म्हणून आपण व्हेज सँडविच, पोहा, उपमा, ओट्स कॉर्न इत्यादी घेऊ शकता.
  8. रात्रीच्या जेवणाला, दुधी, तोंडली, घोसाळे इत्यादी पाणीदार भाज्या खा आणि एकवेळी एक किंवा दोनच चपाती खा. रात्रीच्या जेवणाच्या दोन तासांनंतर झोपेच्या वेळी एक नॉन-क्रीम कप दूध घ्या.

हे देखील लक्षात ठेवा!

– आहार व्यवस्थापनाव्यतिरिक्त थोडा व्यायाम देखील महत्त्वपूर्ण आहे. जर रो करण्यास सक्षम नसाल, तर सकाळी आणि संध्याकाळी 30 मिनिटे चाला.

– जंक फूड, फास्ट फूड, शुगरी ड्रिंक पिणे टाळा. कधीकधी काही खाण्याची तलफ आली तर ते घरीच बनवा, तेही कमी तेलात. बटरऐवजी पिनट बटर वापरा. परंतु, महिन्यातून केवळ एकदा किंवा दोनदाचा याचे सेवन करा.

– आपल्या आहारात फायबर समृद्ध पदार्थांचा समावेश करा. हे आपले पचन सुधारते आणि आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

(Weight loss tips to manage your weight instead of dieting)

हेही वाचा :

Health Tips | गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! कमकुवत होऊ शकते रोग प्रतिकारक शक्ती!

सुंदर आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.