चांगलं आयुष्य, चांगल्या दिवसासाठी सकाळी किती वाजता उठलं पाहिजे? आरोग्याचा राजमार्ग जाणून घ्या
तुम्ही सकाळी लवकर उठता का? तुम्हाला सकाळी लवकर उठण्याचे फायदे माहिती आहे का? याचविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. कारण, पहाटे लवकर उठल्यात दडलाय आरोगी निरोगी राखण्याचा राजमार्ग, जाणून घ्या.
पहाटे लवकर उठणाऱ्यास निरोगी आरोग्य लाभतं, असं पूर्वीपासून म्हटलं जातं. पण, अनेक प्रयत्न करूनही जर तुम्ही रोज सकाळी लवकर उठू शकत नसाल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला असे काही सोपे उपाय सांगणार आहोत. ज्या ट्रिक्समधून तुम्ही पहाटे 5 वाजेपर्यंत सहज पणे उठू शकता. जाणून घ्या. तुम्ही सकाळी लवकर उठले की तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. हे केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच चांगले नाही, तर जीवनात यश मिळविण्याचा हा एक अतिशय सोपा मार्ग आहे. सकाळच्या ताज्या हवेत श्वास घेतल्यास तुम्हा स्वत:ला सकारात्मक ऊर्जा जाणवेल. ज्यांना सकाळी अंथरूण सोडण्यास त्रास होतो, त्यांच्यासाठी हे करणे थोडे कठीण असू शकते. पण, अशक्य नाही.
काही लोक असे असतात ज्यांना काही दिवस सकाळी लवकर उठल्यानंतर ही सवय कायम ठेवता येत नाही. अशातच आम्ही तुम्हाला काही सोपे मार्ग सांगणार आहोत. या मार्गांच्या मदतीने तुम्ही रोज सकाळी 5 वाजता अगदी सहजपणे उठू शकता.
हळूहळू सकाळी उठण्याचा प्रयत्न करा
तुम्ही रोज सकाळी 8 किंवा 9 वाजता उठलात तर अचानक तुम्हाला पहाटे 5 वाजता उठता येणार नाही. यासाठी तुम्हाला हळूहळू जागे होण्याची वेळ बदलावी लागेल. म्हणजेच रोज वेळेच्या किमान 15 मिनिटे आधी उठण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही अर्ध्या तासाने तो कालावधी वाढता. असे केल्याने आपल्या शरीरास या बदलाशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळेल. लक्षात ठेवा की, तुम्ही हे रोज करा, अगदी आठवड्याच्या शेवटी देखील तुम्ही त्याच वेळी उठण्याचा प्रयत्न करता.
कॉफीचे सेवन टाळा
झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी प्यायल्याने झोपेत अडथळा निर्माण होतो. चहा आणि कॉफीमध्ये आढळणारे कॅफिन एखाद्या व्यक्तीला जागृत ठेवते. चांगल्या झोपेसाठी दुपारी आणि संध्याकाळी कॉफीचे सेवन न करणे महत्वाचे आहे.
हलके जेवण करा
रात्रीचे जेवण कसे करत आहात याचा देखील आपल्या झोपेवर परिणाम होतो. रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे, म्हणजेच तुम्ही हलक्या गोष्टींचेच सेवन कराल.
जेवण झोपण्यापूर्वी 2 तास आधी करा
रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी कमीतकमी 2 तास आधी केले पाहिजे. यामुळे अन्न पचायला वेळ मिळेल. अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोपणे टाळा. असे केल्याने तुम्हाला चांगली झोप येईल आणि तुम्ही सकाळी लवकर उठू शकाल.
पुस्तक वाचा
रात्रीची चांगली झोप आणि सकाळी लवकर उठण्यासाठी तुमची संध्याकाळची दिनचर्या देखील खूप महत्वाची भूमिका बजावते. झोपण्याच्या थोड्या वेळापूर्वी एखादं चांगलं पुस्तक वाचा. स्ट्रेचिंग किंवा माइंडफुलनेसचा सराव करू शकता.
मोबाईल आणि टीव्ही पाहणे टाळा
झोपण्यापूर्वी मोबाईल आणि टीव्ही टाळा. त्यातून निघणारा निळा प्रकाश झोपेसाठी आवश्यक असणारे हार्मोन मेलाटोनिन दडपण्याचे काम करतो. संध्याकाळची शांत आणि योग्य दिनचर्या आपल्याला रात्री चांगली झोप घेण्यास मदत करेल आणि आपल्याला सकाळी लवकर उठण्यास देखील मदत करेल.
झोपण्यासाठी चांगले वातावरण हवे
झोपण्यासाठी चांगले वातावरण हवे. चांगल्या झोपेसाठी बेडरूम शांत, गडद आणि थंड असणे खूप महत्वाचे आहे. यासाठी बाहेरचा प्रकाश आत येऊ न देणारे पडदे खरेदी करा. याशिवाय आरामदायी गादी आणि उशी असलेले नॉईज मशीनही खोलीत ठेवावे. यामुळे बाहेरचा आवाज येणार नाही.