नवीन लग्न झालेल्या तरुणी गुगलवर ‘या’ विचित्र गोष्टी सर्च करतायत; याबद्दल जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
लग्नानंतर महिलांचे जीवन बदलते आणि त्यांना अनेक नवीन आव्हानांचा सामना करावा लागतो. गुगलवर नवविवाहित महिला असे काही प्रश्न सर्च करतायत की ते जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
सध्या लग्नसराई सुरु आहे. लग्नानंतर पुरुष आणि महिला दोघांचेही आयुष्य बदलतात. जास्तकरून महिलांचे आयुष्य बदलते. नवीन बदल त्यांना स्विकारावेही लागतात. लग्न म्हटलं की सर्वात जास्त चिंता ही महिलांना असते. कारण नवीन घरात नवीन लोकांमध्ये राहून तिला तीच्या नवीन आयुष्याची सुरुवात करावी लागते. यादरम्यान सासरच्या घरातील अनेक प्रश्न तिच्यासमोर असतात. अनेकवेळा तिला हे प्रश्न कोणालाच विचारता येत नाही. अशा परिस्थितीत ती इंटरनेटची मदत घेते.
नवी नवरी असताना कोणत्याही मुलीला प्रत्येक प्रश्न आपल्या सासरच्या मंडळींना विचारता येत नाही. अशा वेळी त्या त्यांच्या मैत्रिणी किंवा माहेरी आईसोबत तसेच बहिणीसोबत बोलतात. पण काही वेळा तेही शक्य नसतं. मग अशावेळी अनेक नवविवाहीत स्त्रिया या इंटरनेटची मदत घेतात. तुम्हाला माहितेय का? इंटरनेटवर नवीन लग्न झालेल्या स्त्रिया कोणत्याही प्रश्नांची उत्तरे शोधतता ते.
गेल्या अनेक दशकांपासून गुगल हे सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणून वापरात आहे. यावर लोक त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधतात. तशाच प्रकारे एका रिपोर्टनुसार नवीन लग्नानंतर महिला गुगलवर काय-काय सर्च करतात. त्यांच्या मजेदार प्रश्नांची यादी वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.
विवाहित महिला गुगलवर कोणत्या गोष्टींची उत्तरे शोधतात
गुगलकडे असलेल्या आकडेवारीनुसार जास्तीत जास्त लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या पतीबाबतच्या अनेक गोष्टी गुगल मध्ये सर्च करतात. स्त्रिया आपल्या पतीची पसंत आणि नापसंत याबाबत गुगलला अधिकाधिक प्रश्न विचारतात. 1) लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला आपल्या पतीचे मन जिंकायचे असते. अशा परिस्थितीत ती गुगलवर सर्च करते की, लग्नानंतर पतीला कसे खुश ठेवावे. 2) पतीच्या आनंदासाठी पत्नीने काय करावे आणि काय करू नये ? 3) पतीचे मन कसे जिंकायचे ?
पतीला आपल्या कंट्रोलमध्ये कसे ठेवावे?
गूगल डेटानुसार, विवाहित महिला गुगलमध्ये सर्वाधिक सर्च करणारा प्रश्न म्हणजे आपल्या पतीला आपल्या कंट्रोलमध्ये कसे ठेवावे? त्यांना ‘जोरू का गुलाम’ कसे बनवावे? हे सर्वाधिक सर्च केला जाणारा प्रश्न आहे.
बाळाबद्दल प्रश्न सर्च केले जातात
पतीनंतर महिलेच्या जवळचा विषय म्हणजे बाळ. महिलांना त्यामुळे मूल होण्याच्या संदर्भातही सर्वाधिक प्रश्न महिला सर्च करतात. जसं की,
1) लग्नानंतर मूल होण्याची योग्य वेळ कोणती ?
2) कुटुंब नियोजनासाठी मी किती काळ वाट पाहावी?
सासरच्या मंडळींबद्दलही प्रश्न विचारले जातात.
1) लग्नानंतर नवीन कुटुंबात कसे जुळवून घ्यावे? हा प्रश्न नव-वधू जास्त प्रमाणात सर्च करतात. 2) कुटुंबाशी आपण कसे वागले पाहिजे? 3) लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या कशा सांभाळाव्यात?
नवीन कुटुंबातील लोकांमध्ये जुळवून घेणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते. अशा परिस्थितीत तिला इथे कसे राहायचे हे जाणून घेणं तिच्यासाठी महत्त्वाचे असते. आणि ते ती उघडपणे कोणालाही विचारू शकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत तिला गुगल सर्च करणे सोपे जाते.
ज्या महिला नोकरी करतात लग्नानंतर त्यांचे प्रश्न तर काही निराळेच असतात. जसं की, 1) लग्नानंतर घर आणि नोकरी एकत्र कशी सांभाळायची ? 2) लग्नानंतर स्वतःचा व्यवसाय कसा चालवायचा आणि व्यवसायासोबत कुटुंब कसे सांभाळायचे
लग्नानंतर आपलं करिअर संपेल असं अनेक महिलांना वाटतं. पण वेळेचे योग्य व्यवस्थापन केले तर दोन्ही गोष्टी सहज करता येतात. त्यामुळे महिला गुगलवर अशा टिप्स शोधतात.
तर अशा पद्धतीचे प्रश्न नवीन लग्न झालेल्या तरुणी गुगलवर सर्च करत असतात. आणि त्या सर्चमधून नक्कीच त्यांना समाधानकारक उत्तर मिळत असेल म्हणूनच तर यातील अनेक प्रश्न हे गुगलवर सर्वाधिक सर्च केले जाणारे आहेत.