Beauty Tips: ‘जेड रोलर’ म्हणजे काय… ते कसे वापरावे; जाणून घ्या, त्याचे फायदे आणि तोटे!

जेड रोलर म्हणजे काय आणि ते कसे काम करते याबाबत तुम्हाला माहित आहे का.. याशिवाय त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत याबाबतही अधिक माहिती जाणून घ्या.

Beauty Tips: 'जेड रोलर' म्हणजे काय... ते कसे वापरावे; जाणून घ्या, त्याचे फायदे आणि तोटे!
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 10:42 PM

मुंबई : त्वचेला चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी बाजारात अनेक सौंदर्य उत्पादने (beauty products) उपलब्ध आहेत. तसे, लोक आता त्वचेच्या काळजीसाठी घरगुती उपचारांवर खूप विश्वास ठेवतात. इतकंच नाही तर त्वचेची काळजी घेण्यासाठीही अनेक घरगुती ट्रिक्स (Homemade tricks) वापरल्या जातात. या युक्त्यांपैकी एक म्हणजे जेड रोलर. त्याचा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात होत आहे. तुम्हाला जेड रोलर म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते याबाबत माहिती असायला हवी. याशिवाय जेड रोलर वापराचे फायदे आणि तोटे काय आहेत याबाबतही आपल्याला माहिती असायला हवे. आजकाल महिला आणि पुरुष सौंदर्य किंवा त्वचेची काळजी (skin care) घेण्यासाठी अनेक साधने वापरतात. यापैकीच एक जेड रोलर आहे. हे एक प्रकारचे चेहर्यावरील मालिश करण्याचे साधन आहे. जाणून घ्या, त्याची वापराची पद्धत आणि इतर माहिती.

जेड रोलर काय आहे

आजकाल महिला आणि पुरुष सौंदर्य किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक साधने वापरतात. यापैकी एक जेड रोलर आहे. जे एक प्रकारचे चेहर्याचे सौदर्यं वाढविण्यासाठी आवश्यक असलेले मालिश साधन आहे. जुन्या चायनीज पद्धतीने ते बनवले जाते असे म्हणतात. चीनमध्ये, जेड स्टोनमध्ये बरे करण्याचे गुणधर्म असल्याचे मानले जाते. असे बहुतेक रोलर्स नेपर्ट जेडपासून बनवलेले असतात, जे चेहरा स्वच्छ करण्याव्यतिरिक्त त्वचेतील रक्ताभिसरण सुधारतात. हे वापरण्यास अतिशय सोपे आहे. फक्त हातात धरा आणि टाळूवर म्हणजे चेहऱ्याच्या त्वचेवर चालवा. रोज असे केल्याने त्वचेला अनेक फायदे होतात.

त्याचे फायदे जाणून घ्या

संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, चेहऱयावर मालीक करणे हे एक प्रकारचे वैद्यकीय उपचार आहेत, ज्यामुळे आपले रक्त परिसंचरण सुधारते. तुम्ही ते रोज देखील वापरू शकता. चेहऱ्याचा मसाज व्यवस्थित केला तर त्वचाही घट्ट होऊ शकते. जेड रोलरच्या मदतीने तुम्ही सैल त्वचा घट्ट करू शकता. हे अँटी-एजिंग एजंट म्हणून काम करते. संशोधनात असेही सांगण्यात आले आहे की, जर तुम्ही दररोज चेहऱ्याची मसाज करत असाल तर त्यामुळे तुमचा मूडही सुधारतो. तुम्हाला आराम वाटतो.

त्याचे तोटे जाणून घ्या

त्याचे परिणाम फार काळ टिकत नाहीत. जर तुम्ही ते वापरणे बंद केले तर जे परिणाम दिसतात, ते दिसणे बंद होतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. हा त्याचा मोठा तोटा मानला जातो. आता असे जेड रोलर्स बाजारात मिळत आहेत, जे अधिक नफ्यासाठी जेड रोलर्स बनविण्यासाठी चांगले मटेरियलने वापरत नाहीत. जुन्या पद्धतीने बनवलेले रोलर्स फायदे देत असले तरी, आता बाजारात मिळणारे जेड रोलर्स बनविण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जात आहे आणि ते त्वचेसाठी चांगले नाही.

ही पण बातमी वाचा

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.