‘ब्रेकफास्ट’ शब्दाचा नेमका अर्थ काय? नाश्त्यामध्ये कोणते घटक महत्त्वाचे?

सकाळच्या नाश्त्याला न्याहारी किंवा ब्रेकफास्टही म्हटले जाते. पण सकाळच्या नाश्त्याला ब्रेकफास्ट का म्हणतात?? (What is Meaning of Breakfast)

'ब्रेकफास्ट' शब्दाचा नेमका अर्थ काय? नाश्त्यामध्ये कोणते घटक महत्त्वाचे?
नाश्ता
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 9:38 AM

मुंबई : निरोगी राहण्यासाठी सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा असतो. सकाळच्या नाश्त्याची प्रत्येकाला फार गरज असते. कारण यातूनच तुम्हाला संपूर्ण दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे तुमचे शरीर दिवसभर ताजेतवाने राहते. सकाळच्या नाश्त्याला न्याहारी किंवा ब्रेकफास्टही म्हटले जाते. पण सकाळच्या नाश्त्याला ब्रेकफास्ट का म्हणतात, हे तुम्हाला माहिती आहे का?? (What is Meaning of Breakfast)

?ब्रेकफास्टचा अर्थ काय? 

आपण रात्री 9 ते 9.30 या वेळेत जेवतो. त्यानंतर रात्रीचे जेवण झाल्यानंतर झोपलो की सहा ते सात तासांनी उठतो. माणसाच्या अन्नाचे पचन होण्यासाठी साधारण तीन ते चार तास पुरेसे असतात. त्यानंतर उर्वरित वेळेत तुमचे पोट रिकामे असते. रात्रीच्या जेवणानंतर व्यवस्थित झोप घेऊन उठल्यानंतर तुम्हाला 7 ते 8 तासांचा उपवास घडतो. उपवासाला इंग्रजीत फास्ट (Fast) असे म्हणतात. तर तो उपवास मोडणे याला ब्रेक (Break) असे म्हटले जाते. त्यामुळेच Breakfast हा शब्दाला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

?नाश्ता करणे का गरजेचे?

सकाळी उठल्यावर दिवसभराच्या धावपळीसाठी, शारीरिक हालचालींची कामं करण्यासाठी आपल्याला प्रचंड ऊर्जेची गरज असते. आपला सकाळचा नाश्ता त्यासाठी आवश्यक ऊर्जा शरीरात निर्माण करत असतो. रात्री दीर्घकाळ काही न खाल्ल्याने किंवा उपाशी राहिल्याने थकवा जाणवतो. त्यामुळेच सकाळी उठल्यानंतर नाश्ता करणे गरजेचे आहे.

?नाश्ता टाळणे शरीरासाठी घातक

मात्र कित्येकदा सकाळी भरपेट खाल्ल्याने झोप येते, असे कारण देऊन अनेकजण नाश्ता करणं टाळतात. पण त्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात. हल्ली उपाशी राहण्याची क्रेझ आली आहे. मात्र यामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतात.

जर आपण सकाळचा नाश्ता योग्य वेळी केला नाही, तर आपली स्मरणशक्तीही कमी होऊ लागते. कारण झोपेनंतर मेंदूत ग्लुकोजचं प्रमाण कमी होते. सकाळचा नाश्ता हा आपल्या मेंदूला पर्यायी ग्लुकोज पुरवत असतो. जेणेकरून आपण आपल्या दिवसाची सुरूवात एका जोशात आणि नव्या उर्जेने करु शकतो. जे लोक नियमितपणे नाश्ता करतात त्यांच्या शरीरात प्रमाणबद्ध वजन, साखरेचं योग्य प्रमाण, उत्तम मन:स्वास्थ्य, एकाग्रता असते.

?नाश्त्यामध्ये नेमके घटक असावेत?

सकाळच्या नाश्त्यात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ, कबरेदके इत्यादी घटकांचा समावेश असावा.

?तंतूमय पदार्थ : आपल्या आहारात तंतू असणं हे फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर आजारांना लांब ठेवण्यासाठीही गरजेचं आहे.

?प्रथिनं : अंडी, मासे, दूध इत्यादी पदार्थात प्रथिनं असतात. उकडलेलं अंड किंवा अंडयातील चरबी नसलेले पदार्थ तुम्ही नाश्ता म्हणून खाऊ शकता.

?कर्बोदके : धान्यातून आणि संपूर्ण धान्याच्या ब्रेडमधूनही संमिश्र कार्बोदके मिळतात. त्यातून शरीराला आवश्यक पोषण मिळते.

?पाणी : आपल्या शरीरासाठी पाणी फार गरजेचे आहेत. पाणी योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने, योग्य वेळी पिण्याचे फार महत्त्व आहेत. त्यामुळे दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे.

?अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट्स : सकाळच्या नाश्त्याला तुम्ही रंगीत फळं आणि भाज्यांचा आहार घ्यावा. ज्यात भरपूर प्रमाणात अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट्स असतात. त्यामुळे तुमच्या दिवसाची ऊर्जादायी होऊ शकते. (What is Meaning of Breakfast)

संबंधित बातम्या : 

मुळ्याची पाने खाण्याचा कंटाळा करतायत?, थांबा जाणून घ्या ‘हे’ फायदे

सकाळी उशिरा केलेला नाश्ता या गंभीर आजाराला ठरेल आमंत्रण, जाणून घ्या योग्य वेळ कोणती?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.