चहात आलं किसून घालावं की चिरून? जाणून घ्या
तुम्ही आल्याचा चहा पिता का? जर तुम्ही आल्याचा चहा पित असाल तर त्याची योग्य पद्धत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चहा बनवताना त्यात आलं चिरून टाकावं की किसून टाकावं, हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर योग्य उत्तर जाणून घ्या.
आपण अनेकदा चहा बनवतो. त्यातही थंडीच्या दिवसात आल्याच्या चहाला अधिक प्राधान्य असते. त्यामुळे यात आलं नेमकं कसं घालावं, हा प्रश्न अनेकांना पडतो. चहा बनवताना त्यात आलं चिरून टाकावं की किसून टाकावं, हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर योग्य उत्तर जाणून घ्या. यावर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, या वापरून तुम्ही चांगला चहा बनवू शकतात. चहा पिणे हा प्रत्येक भारतीयांच्या सकाळ-संध्याकाळच्या दिनक्रमाचा एक भाग आहे. किंवा चहा हा भारतीयांच्या दिनक्रमात समाविष्ट असतोच. दिवसाची सुरुवात चवदार चहाने केल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो. कारण, कडक चहा पिल्यानं एक प्रकारचा उत्साह येतो.
अनेक लोक असे असतात ज्यांना बरेच प्रयत्न करूनही चांगला चहा बनवता येत नाही. स्वादिष्ट चहा बनवण्याच्या काही टिप्स आहेत. त्या टिप्स वापरल्यास तुम्ही देखील स्वतःसाठी चहा तयार करू शकता. तो देखील अगदी स्वादिष्ट. आम्ही सांगितलेल्या टिप्स वापरून चहा केल्यास तुमचा दिवसभराचा थकवा दूर होऊ शकतो. चहाची चव वाढवण्यात आल्याचा मोठा वाटा असतो. हे देखील तुम्हाला माहिती आहे. चहामध्ये आले घालण्याची ही एक पद्धत आहे. चहामध्ये आले चिरून घ्यावे की किसून टाकावे, हा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडला असेल, याचंच उत्तर किंवा ट्रिक्स आम्ही आज सांगणार आहोत, जाणून घ्या.
चहा बनवण्यासाठी आलं चिरून घेणं योग्य आहे. कारण चहाला आल्याचा रस लागतो. आले किसल्याने चहा कडू होऊ शकतो. हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक ठिकाणी सर्रासपणे आले किसून टाकले जाते. त्यामुळे चहा खूप कडू झालाय किंवा तिखट झालाय, असंही म्हणतात. यामुळे चहात आले नेहमी चिरून टाकावे.
आले किसल्याने चव आणि सुगंध अधिक तीव्र होतो. यामुळे चहाची चव खराब होते. आले किसल्याने आल्याचे तंतू तुटतात आणि चहामध्ये चांगले मिसळतात. यामुळे चहाची चव असंतुलित होऊ शकते. यामुळे कधीही चहा करताना त्यात आले हे चिरूनच टाकावे. किसून आले टाकू नये.
चहामध्ये आले घालण्याची योग्य वेळ कोणती?
चहाची पाने किंवा चहापत्ती घालण्यापूर्वी आपण पाण्यात आले घालू शकता आणि 2-3 मिनिटे उकळू शकता. याशिवाय चहाच्या पानासोबत किंवा चहापत्तीसोबत आले पाण्यात टाकून 3-5 मिनिटे उकळू शकता. त्यानंतर दूध घालून झाकूनही उकळू शकतात.
चहा पिण्याचे तोटे कसे टाळता येईल?
तुम्ही जास्त चहा प्यायला तर ते तुमचं नुकसान करू शकतात. जास्त चहा प्यायल्याने झोप आणि भूक या दोन्हींवर परिणाम होतो. जास्त चहा प्यायल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. भरपूर पाणी पिऊन चहा प्यायल्यास गॅस आणि अॅसिडिटीची समस्या टाळता येते. जास्त चहा प्यायल्याने दातांच्या समस्या देखील उद्भवू शकतात.