बॉडी लोशन आणि बॉडी ऑइलमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या त्वचेसाठी काय फायदेशीर?
हिवाळ्याला सुरुवात झाली की त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. त्यासाठी अनेकदा बरेच जण बॉडी लोशन आणि बॉडी ऑईलचा वापर करतात.
हिवाळा येताच त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. यामुळे हिवाळ्यात त्वचेला ओलावा आणि पोषण देण्यासाठी योग्य उत्पादन वापरणे खूप महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात आपले शरीर आणि त्वचा मुलायम ठेवण्यासाठी लोक विविध प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतात. काही जण बॉडी लोशन लावतात तर काहीजण बॉडी ऑइल लावतात. हिवाळ्यात बॉडी ऑइल आणि बॉडी लोशन यापैकी कोणते चांगले आहे याबद्दल अनेकांमध्ये संभ्रम असतो. या दोघांपैकी काय निवडायचे हे अनेक लोक ठरवू शकत नाहीत. या दोघांचे स्वतःचे वेगळे फायदे आहेत. परंतु तुमच्या त्वचेच्या प्रकारावर तुम्ही काय वापरावे हे अवलंबून असते. जाणून घेऊया हिवाळ्यात बॉडी लोशन वापरणे योग्य की बॉडी ऑइल.
बॉडी लोशन आणि बॉडी ऑइल मधील फरक
बॉडी ऑइल
बॉडी ऑइल त्वचेला हायड्रेट करते. तसेच बॉडी ऑइल त्वचेला सखोल पोषण करते. हे नैसर्गिक तेलाने बनलेले आहे आणि त्वचेची आर्द्रता लॉक करण्याचा काम करते. त्यासोबतच त्वचेच्या वरच्या थरावर एक संरक्षणात्मक थर तयार करते. ज्यामुळे ओलावा बाहेर पडत नाही. अंघोळीनंतर किंचित ओल्या त्वचेवर बॉडी ऑइल लावल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.
बॉडी लोशन
बॉडी लोशन हे हलके वजनाचे असून ते त्वचेत सहज शोषल्या जाते आणि त्वचेला मॉइश्चराईज करते. बॉडी लोशन पाणी आणि तेलाच्या मिश्रणापासून तयार केले जाते. बॉडी लोशन त्वचेला ओलावा आणते आणि त्वचा मऊ करते. दिवसातून कोणत्याही वेळी तुम्ही बॉडी लोशन त्वचेवर लावू शकतात.
बॉडी ऑइलचे फायदे
शरीराला बॉडी ऑइल लावण्याचे अनेक फायदे आहेत. बॉडी ऑइल त्वचेचे पोषण करते. तसेच त्वचा कोडी होण्यापासून संरक्षण करते. बॉडी ऑईलच्या वापराने शरीरात बराच काळ ओलावा टिकून राहतो. याशिवाय हिवाळ्यात तुम्ही तुमच्या शरीराला बॉडी ऑइलने मसाज करू शकता. ज्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते.
बॉडी लोशनचे फायदे
बॉडी लोशन्स देखील अनेक फायदे आहेत. ज्यांची त्वचा सामान्य आणि तेलकट आहे. त्यांच्यासाठी बोडी लोशन हा एक उत्तम पर्याय आहे. ते त्वचेला लवकर मॉइश्चराईज करते तसेच तुम्ही उन्हाळ्यातही त्वचेसाठी बॉडी लोशनचा वापर करू शकता.
त्वचेसाठी काय चांगले आहे?
तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार बॉडी लोशन किंवा बॉडी ऑइल ची निवड करू शकता. उदाहरणार्थ जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुमच्यासाठी बॉडी ऑइल हा उत्तम पर्याय आहे. कारण ते त्वचेला खोलवर मॉइश्चराइज करते. परंतु जर तुमची त्वचा सामान्य असेल तर बॉडी लोशन तुमच्यासाठी चांगले आहे.