AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘6-6-6 वॉकिंग रूल’ नेमकं काय आहे? जाणून घ्या फायदे आणि धोके!

फिट राहण्यासाठी रोज नवनवीन ट्रेंड्स येतात आणि जातात. सध्या सोशल मीडियावर ‘6-6-6 Walking Rule’ ची बरीच चर्चा आहे. सकाळी ६ वाजता, ६ किलोमीटर, आठवड्यातून ६ दिवस! ऐकायला एकदम सोपं वाटतंय ना? वाटतंय की चला, उद्यापासून सुरू करूया! पण थांबा! हा नियम खरंच तुमच्यासाठी योग्य आहे का? याचे फायदे तर आहेतच, पण काही तोटे किंवा धोके तर नाहीत ना? चला, या नव्या फिटनेस फंडाची जरा सखोल माहिती घेऊया!

'6-6-6 वॉकिंग रूल' नेमकं काय आहे? जाणून घ्या फायदे आणि धोके!
चालण्याचे नियम
Follow us
| Updated on: Apr 25, 2025 | 2:48 PM

फिट राहण्यासाठी वेगवेगळे फंडे आणि ट्रेंड्स नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी intermittent fasting, कधी १० हजार स्टेप्स चॅलेंज, तर आता नवा फंडा चर्चेत आलाय ‘6-6-6 Walking Rule’! नाव जरी थोडं गोंधळात टाकणारं असलं, तरी हा नियम खूप सोपा आहे आणि अनेक जण याचा वापर फिटनेससाठी करत आहेत.

नेमकं काय आहे हा ‘6-6-6 वॉकिंग’ नियम?

पहिलं 6 म्हणजे : सकाळी 6 वाजता उठून चालायला जायचं. दुसरा 6 म्हणजे : दररोज 6 किलोमीटर अंतर चालायचं. तिसरा 6 म्हणजे : आठवड्यातून 6 दिवस हे पाळायचं!

हे नियम फॉलो करण्याचे फायदे –

वजन कमी करण्यास मदत: दररोज ६ किलोमीटर चालल्याने शरीरातील कॅलोरीज बर्न होतात आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

हृदय आणि फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते: चालणं हा एक सर्वोत्तम कार्डिओ व्यायाम आहे, ज्यामुळे हार्ट मजबूत होतं.

डायबिटीज आणि बीपीवर नियंत्रण: चालण्याने रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवणं शक्य होतं.

मानसिक तणाव कमी होतो: सकाळी चालल्यानं फक्त शरीर नव्हे, तर मनही फ्रेश होतं आणि मूड सकारात्मक राहतो.

पण प्रत्येकासाठी हा नियम योग्य असेलच असं नाही!

हा नियम फॉलो करण्याचे तोटे –

अतिव्यायामाचा धोका: एकदम ६ किलोमीटर चालणं सुरुवातीला शरीरावर ताण आणू शकतं.

सांधेदुखीचा त्रास: चुकीची चालण्याची पद्धत किंवा चुकीचे शूज वापरल्यास गुडघे व घोटे दुखू शकतात.

हृदयविकार किंवा सांध्यांचे आजार असणाऱ्यांसाठी धोकादायक: अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच चालण्याचा प्लॅन ठरवावा.

मग कोणासाठी हा फंडा योग्य?

1. ज्यांना चालायची सवय आहे आणि फिटनेस राखण्याची इच्छा आहे. 2. ज्यांचं वजन कमी करायचं आहे आणि एक ठरावीक रूटीन हवं आहे. 3. ज्यांच्याकडे रोज सकाळी वेळ आहे आणि चालणं आवडतं.

आणि कोणी टाळावं?

ज्यांना सांध्यांचे दुखणे, हृदयविकार किंवा वजन खूप जास्त आहे, त्यांनी हळूहळू सुरुवात करावी आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत.
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका.
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव.
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.