भाजीत मीठ जास्त प डलेतर काय करायचे? जाणून घ्या काही सोप्या टिप्स

भाजी करत असताना जर तुमच्याकडून भाजी मध्ये मीठ जास्त पडले तर काळजी करण्याची गरज नाही. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही भाजीत जास्त झालेले मीठ कमी करू शकता. जाणून घेऊया चार टिप्स बद्दल ज्या भाजीमध्ये जास्त झालेले मीठ कमी करण्यास मदत करतील.

भाजीत मीठ जास्त प डलेतर काय करायचे? जाणून घ्या काही सोप्या टिप्स
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 3:24 PM

काही वेळा घाई मध्ये स्वयंपाक करताना चुकून एखाद्या भाजीत मीठ जास्त पडते. त्यामुळे त्या पदार्थाची चव खराब होते. एवढेच नाही तर भाजीत मीठ जास्त झाल्याने ते कसे दुरुस्त करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो आणि त्या वेळेला त्या भाजीत अनेकजण पाणी टाकतात. पण भाजीत पाणी टाकल्याने मीठ कमी होते पण उरलेल्या भाजीचे चव बिघडते. जर तुमच्या सोबतही असे काही घडले असेल तर तुम्ही भाजीत पाणी टाकण्याऐवजी काही सोप्या टिप्स वापरणे गरजेचे आहे ज्यामुळे तुमच्या भाजीची चव खराब होणार नाही. सोबतच तिखट आणि मीठ कमी पडणार नाही. जाणून घेऊया अशाच काही टिप्स बद्दल ज्या तुम्हाला उपयोगी ठरतील.

लिंबाचा रस भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यावर त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. त्यामुळे तुमच्या भाजीत मीठ बरोबर होईल. खरे तर कोणत्याही भाजीत लिंबासारखा आंबट पदार्थ घातल्याने मीठ कमी होते. एवढेच नाही तर ते तुमच्या डिशची चव देखील वाढवते. लिंबाचा रस वापरण्यामागील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सुक्या भाजीमध्ये मीठ कमी करण्यासाठी देखील लिंबूचा रस वापरू शकता.

पिठाचा गोळा हा एक सर्वात सोपा उपाय आहे. तुमच्या भाजीमध्ये मीठ जास्त झाले असेल तर मध्यम आकाराचा एक छोटा गोळा गव्हाच्या पिठाचा बनवून भाजीत टाका. हा पिठाचा गोळा भाजीत असलेले जास्तीचे मीठ शोषून घेईल. मात्र भाजी सर्व्ह करण्यापूर्वी पिठाचा गोळा काढून एकदा चाखून बघा. हा उपाय बऱ्याच घरांमध्ये केला जातो.

कच्चा बटाटा भाज्यांमध्ये मीठ जास्त झाल्यास तुम्ही त्याच्या बटाट्याचा वापर करू शकता. कच्च्या बटाट्याचे तुकडे त्या भाजीमध्ये ठेवा त्यांना किमान 20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यामुळे बटाटे त्या भाजीतील अतिरिक्त मीठ शोषून घेईल. पण भाजी सर्व्ह करण्यापूर्वी चाखून बघायला अजिबात विसरू नका.

फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम वापरून तुम्ही भाजीमध्ये जास्त झालेले मीठ कमी करू शकता. खरे तर भाजीमध्ये फ्रेश क्रीम टाकल्याने भाजी घट्ट होते आणि मीठ देखील कमी होते.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.