Pregnancy | नॉर्मल डिलिव्हरी हवीय ? मग या गोष्टी नक्की करा
महिलांना प्रसूतीदरम्यान प्रचंड त्रास होतो. याच त्रासापासून वाचण्यासाठी महिला सिझेरियन डिलिव्हरीला पसंदी देतात. मात्र प्रसूतीतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार महिलांनी नॉर्मल डिलिव्हरीला प्राधान्य दिले तर प्रसूतीनंतर त्यांचे शरीर लवकर पूर्ववत होते. तसेच नॉर्मल डिलिव्हरी आई आणि बाळासाठी मोठी फायदेशीर असते.
मुंबई : आई होणं ही कल्पनाच मुळात सुख आणि वेगळं समाधान देणारी आहे. गरोदर राहिल्यापासून ते बाळ जन्माला येईपर्यंत महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याच काळात महिलांना आपल्या मुलाची तसेच नॉर्मल डिलिव्हरीची चिंता सतावत असते.
महिलांना प्रसूतीदरम्यान प्रचंड त्रास होतो. याच त्रासापासून वाचण्यासाठी महिला सिझेरियन डिलिव्हरीला पसंदी देतात. मात्र प्रसूतीतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार महिलांनी नॉर्मल डिलिव्हरीला प्राधान्य दिले तर प्रसूतीनंतर त्यांचे शरीर लवकर पूर्ववत होते. तसेच नॉर्मल डिलिव्हरी आई आणि बाळासाठी मोठी फायदेशीर असते.
नॉर्मल डिलिव्हरीचे काय फायदे आहेत ?
नॉर्मल डिलिव्हरीचे अनेक फायदे आहेत. नॉर्मल डिलिव्हरीनंतर महिलेचे शरीर लवकर पूर्वरत होते. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर महिलांना जास्त काळासाठी प्रसूतीगृहात राहण्याची गरज नसते. तसेच महिलांचे शरीर तसेच हार्मोन्स लवकर पहिल्यासारखे होतात. आईचे शरीर लवकर नॉर्मल होते.
नॉर्मल डिलिव्हरीमुळे बाळालादेखील अनेक फायदे मिळतात. प्रसूतीदरम्यान महिलाच्या शरीरातून अनेक हार्मोन्स रिलीज होत असतात. त्यानंतर बाळ बर्थ कॅनालमधून बाहेर येते. बाळाचा जन्म बर्थ कॅनालमधून झाल्यामुळे बाळाची छाती एकदम साफ असते. बाळाला श्वासाबाबतचा धोका कमी असतो. त्याचबरोबर बाळाचा जन्म जेव्हा योनीमार्गाद्वारे होते तेव्हा त्याला माईक्रोबायोम नावाचा सुरक्षात्मक जिवाणू मिळतो. याच कराणामुळे त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
सामान्य प्रसूतीसाठी गरोदरपणात या गोष्टी करा
1. गर्भधारणेदरम्यान आईला गोड किंवा मसालेदार अन्नपदार्थ खावे वाटतात. मात्र या काळात चॉकलेट, चायनीज, पिझ्झा असे अन्नपदार्थ खाऊ नका.
2. महिला गरोदरपणात काम करत नाहीत. पण गरोदरपणात हलके फुलके काम केल्याने प्रसूती सामान्यपणे होण्याची शक्यता वाढते. मात्र काम करताना जड सामान उचलू नये. तसेच वाकूनदेखील काम करु नये.
3. गरोदरपणात महिलांचे वजन वाढते. स्नायूदेखील कडक होतात. याच कारणामुळे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये होणारा त्रास त्यांना सहन होत नाही. त्यामुळे तेलाची मसाज केल्यामुळे स्नायू नरम पडतात.
4. या काळात सकारात्मक विचार विकसित करायला हवेत. तणावाला दूर ठेवायला हवं.
5. चांगली पुस्तके वाचायला हवीत. संगीत ऐकायला हवं.
इतर बातम्या :
तुमच्याकडे गोड बातमी आहे..? मग चुकूनही पहिल्या 3 महिन्यात हे करू नका…
Bloating Remedy: जेवल्यानंतर पोटात तयार होतो गॅस, औषधांपेक्षा अधिक फायदेशीर आहेत या 7 औषधी वनस्पती
कॉफीसोबत हा पदार्थ तुम्ही वापरत आहात तर सावधान…स्किन केअरसाठी कॉफीसोबत हे वापरू नका…