कधी आहे अन्नपूर्णा जयंती? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व

अन्नपूर्णा जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते. यावर्षी अन्नपूर्णा जयंती कधी आहे आणि अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी काय करावे हे जाणून घेऊ.

कधी आहे अन्नपूर्णा जयंती? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 8:08 PM

हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा देवीला विशेष महत्त्व आहे. अन्नपूर्णा जयंती ही अन्नपूर्णा देवीला समर्पित आहे. अन्नपूर्णा जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरातील ऐश्वर्य वाढते. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करून जीवनातील अनेक दुःख दूर होतात.

अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवास देखील केला जातो. अशी मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो आणि तिच्या कृपेने घरात अन्नधान्याची कमतरता होत नाही. जाणून घेऊया अन्नपूर्णा जयंती कधी आहे आणि अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी काय करावे?

कधी आहे अन्नपूर्णा जयंती? यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा 14 डिसेंबर रोजी दुपारी 4:58 ला सुरू होणार असून ही पौर्णिमा 15 डिसेंबर रोजी दुपारी 2:31 वाजता संपेल. यामुळे 15 डिसेंबर रोजी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाणार आहे.

अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी हे नक्की करा:

अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला.

यानंतर देवघर गंगाजल टाकून स्वच्छ करा.

या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल तर उपवास करण्याचा संकल्प करा.

देवघराच्या जवळ अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवा.

अन्नपूर्णा देवीच्या मूर्ती किंवा फोटो समोर धूप आणि दिवा लावा.

पूजेसाठी हळद, कुंकू, अक्षदा, नैवेद्य, तुळशीची पाने ठेवा.

नैवेद्यामध्ये शिरा, पुरी आणि भाज्या तयार करून ठेवा.

पूजा करताना अन्नपूर्णा देवीच्या स्त्रोतांचा आणि मंत्रांचा जप करा.

यासोबतच देवीला अक्षदा, फुले समर्पित करा.

पूजा संपल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना या प्रसादाचे वाटप करा.

पूजेमध्ये देवीचा मंत्र ‘ओम अन्नपूर्णाय नमः’ चा 108 वेळा जप करा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.