विमानाच्या शौचालयातील विष्ठा अन् मलमूत्र हवेत? उत्तर फारच इंट्रेस्टिंग, तुम्हाला जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल

विमानातील शौचालये जमिनीवरील शौचालयांपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करतात. तुम्ही विमानातून प्रवास करत असताना तुम्हाला हा प्रश्न नक्की पडला असेलच ना की खरंच विमानाच्या शौचालयातील मलमूत्राचा निचरा नक्की होतो कसा? हे मलमूत्र नक्की जात कुठे? उत्तर आहे फारच इंट्रेस्टींग जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

विमानाच्या शौचालयातील विष्ठा अन् मलमूत्र हवेत? उत्तर फारच इंट्रेस्टिंग, तुम्हाला जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 1:06 PM

तुम्ही बस, ट्रेन किंवा खाजगी कारने प्रवासा करत असाल तेंव्हा तुम्हाला लघवीसाठी किंवा शौचास जाण्यासाठी गाडी थांबते आणि रेल्वेमध्ये तर ती सुविधा असतेच. त्याच पद्धतीने हवेत उंच उडत असलेल्या विमानातही शौचालय असतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की विमानात मानवी मलमूत्र जातं तरी कुठे?

विमानात सर्व प्रकारच्या सामान्य सुविधा उपलब्ध असतात. त्यात स्वच्छतागृह सुविधांचाही समावेश असतो. पण विमानाने प्रवास करताना कधीतरी हा विचार मनात येतोच की विमानात टॉयलेटमध्ये गेल्यावर मानवी मलमूत्र जातं तरी कुठे? रेल्वेप्रमाणे ही घाण वरून थेट जमिनीवर पडत नाही मग याचा निचरा होतो तरी कसा. चला जाणून घेऊया विमानात तुमचा मल कुठे जातो?

विमानात शौचालयातील मलमूत्राचा निचरा नक्की होतो कसा?

विमानात एक अतिशय लहान वॉशरूम आहे, ज्यामध्ये मानवी विष्ठा आणि मूत्र साठवण्यासाठी टाकी आहे. आता तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे, त्यामुळे फ्लाइटमध्येही व्हॅक्यूम टॉयलेटची सुविधा उपलब्ध आहे. फ्लशमध्ये फ्लश करण्यासाठी पाण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही फ्लश बटण दाबता, तेव्हा टॉयलेट बाऊलच्या तळाशी एक व्हॉल्व्ह उघडते, त्यास खाली असलेल्या पाईपशी जोडते. तो पाईप कचरा टाकीला जोडलेला आहे. व्हॉल्व्ह उघडल्याने पाईपमध्ये व्हॅक्यूम तयार होतो जो टॉयलेटमधील सामग्री शोषून घेतो.

ही प्रणाली व्हॅक्यूम क्लिनरसारखी आहे. बटण दाबताच ते व्हॉल्व्ह उघडते सक्शनने जोडलेल्या टाकीत ते खेचले जाते. व्हॅक्यूम प्रणालीद्वारे, सर्व घाण थेट टाकीमध्ये साठते. साधारणपणे या टाकीची क्षमता 200 लिटरपर्यंत असते. हे फ्लाइट ते फ्लाइट बदलू शकते.

अर्थातच टॉयलेट फ्लश पंपद्वारे चालवले जाते, ज्यामुळे टाकीमध्ये व्हॅक्यूम तयार होतो. जसजसे विमान हवेत झेपावते आणि टाकीमध्ये हवेमुळे दाब तयार होतो, तेव्हा नैसर्गिकरित्या व्हॅक्यूम तयार होतो आणि पंप बंद होतो.यामुळे टॉयलेट शीट स्वच्छ असते.

टॉयलेट शीटमध्ये टेप्लॉनचा थर असतो. त्याला काहीही चिकटत नाही. अशा स्थितीत हवेच्या दाबामुळे ते पूर्णपणे स्वच्छ होतात. व्हॉल्व्ह उघडताच, हवेची जोरदार गर्दी सर्वकाही साफ करते. विमान कंपन्या त्यांना विमानात किती शौचालये हवी आहेत आणि कुठे हवी आहेत हे निवडतात.

टाकी कधी आणि कशी रिकामी करतात?

या टाक्या कशा स्वच्छ केल्या जातात? आणि कधी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वास्तविक विमान उतरताच त्याची साफसफाई सुरू होते. हे काम शौचालय कर्मचारी करतात. शौचालयाची टाकी वामाच्या टॉयलेट टाकीशी पाईपद्वारे जोडलेली असते. बटन चालू करताच या टाकीतून सर्व घाण निघून जाते. अशापद्धतीने या घाणीचा निचरा होतो.

“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.