चीनमध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना या आजाराचा भारताला किती धोका?

China : चीनमध्ये वाढत असलेल्या न्यूमोनियामुळे जगभरातील लोकांच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोना महामारीनंतर चीनमध्ये आणखी एका आजाराचा उद्रेक होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. हा आजार भारतासाठी किती धोकादायक आहे हे जाणून घेऊया.

चीनमध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना या आजाराचा भारताला किती धोका?
CHINA VIRUS
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 5:21 PM

China Pneumonia : कोरोना महामारीने थैमान घातल्यानंतर आता चीनमध्ये एका नव्या आजाराने दहशत पसरवली आहे. चिंतेचे कारण असे की, या आजाराचा लहान मुलांवर अधिक परिणाम होत आहे. कोरोना सारख्या आजारामुळे जगभरात अनेकांनी आपला जीव गमवला होता. वुहान शहरातून त्याची पहिली केस नोंदवली गेली आणि नंतर हळूहळू या विषाणूने संपूर्ण जगात कहर केला. चीनमध्ये आता आणखी एका आजाराने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची संख्या वाढत आहे.

चीनमध्ये सातत्याने वाढताय रुग्ण

चीनच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनानंतर येथे आणखी एका आजाराने पाय पसरले आहे.  यामुळे आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे. या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये बहुतांश मुले आहेत. मात्र यानंतर वृद्ध आणि गर्भवती महिलाही याला बळी पडू शकतात.

चीनमध्ये पसरत जाणाऱ्या या संसर्गामुळे लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत. चीनचे म्हणणे आहे की इन्फ्लूएंझा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, रेस्पिरेटरी सिंसिटिअल व्हायरस (RSV) आणि SARS-CoV-2 सारखे ज्ञात रोगजनक या श्वसन रोगाच्या वाढीस कारणीभूत आहेत.

डब्ल्यूएचओच्या मते, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया हा एक सामान्य संसर्ग आहे, जो सामान्यतः लहान मुलांना प्रभावित करतो. चीनमधील १८ वर्षांखालील बहुतेक रुग्णांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारताला या आजाराचा धोका आहे का?

याचे उत्तर सध्यातरी नाही असेच आहे. भारताला याबाबत अजून धोका नाही. सध्या या आजाराचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी आटोक्यात आहे. चीनमधील वाढत्या केसेस पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली होती आणि सरकार सक्रियपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि सर्व आवश्यक उपाययोजना करत असल्याचे सांगितले होते. भारताकडे अशा प्रकारच्या संक्रमणांशी लढण्यासाठी लस आणि औषधे सहज उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.