कॉफी पिणे कोणी टाळले पाहिजे? जाणून घ्या तज्ञ काय सांगतात
जर तुम्हाला पचनाची समस्या असेल तर तुम्ही कॉफी पिणे टाळले पाहिजे. कॉफी पिणे सगळ्यांसाठी चांगले असते असे नाही. कॉफी पिल्याने अनेकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे कॉफी पिणे कोणासाठी हानिकारक ठरु शकते जाणून घ्या. कॉफी पिणे कोणी टाळले पाहिजे?
Is Coffee Good For Everyone : कॉफी पिणे आरोग्यासाठी काही प्रमाणात फायदेशीर आहे. कारण त्यांत अनेक पोषक गुणधर्म आढळतात, जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. काही अभ्यासानुसार, कॉफी पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. पण जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्याने आरोग्यालाही हानी पोहोचते हे देखील तिकतेच खरे आहे. कॉफी पिणे प्रत्येकासाठी चांगले आहे का? न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी याबाबत खुलासा केला आहे.
दीपशिखा यांच्या माहितीनुसार, कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, मात्र कॉफी ही प्रत्येकासाठी सारखीच काम करते असे नाही. कारण काही लोकांसाठी कॉफी पिणे हानिकारक ठरू शकते. कॉफी प्यायल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. मूड देखील चांगला राहतो. कॉफीमुळे शरीराला पुरेशा प्रमाणात ऊर्जाही मिळते. पण काही लोकांसाठी ती योग्य ठरु शकत नाही.
कॉफी कोणी पिऊ नये?
जर तुम्हाला चिंता करण्याची समस्या असेल तर तुम्ही कॉफी पिणे टाळले पाहिजे. अशा लोकांसाठी ती हानिकारक ठरू शकते. कॉफी प्यायल्याने कधीकधी हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊ शकतात. ज्यामुळे पॅनीक अटॅक देखील येऊ शकतो.
जर कोणाला पचनाच्या समस्या असतील त्यांना देखील कॉफी पिणे टाळले पाहिजे. कॉफी ही आम्लयुक्त आहे. यामुळे गॅस आणि अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात.
जर महिला गर्भवती असेल किंवा ती स्तनपान करत असेल तर त्यांनी देखील कॉफी पिणे टाळले पाहिजे. अशा लोकांसाठी ते हानिकारक असू शकते.
View this post on Instagram
एका दिवसात किती कॉफी प्यावी?
अन्न आणि औषध प्रशासनाच्या मते, एक निरोगी व्यक्ती एका दिवसात 400 मिलीग्राम कॅफिन घेऊ शकतो. याचा अर्थ जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही दिवसभरात 2 ते 3 कप कॉफी पिऊ शकता. पण जर तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर तुम्ही कॉफी पिण्याआधी डॉक्टरांशी बोलले पाहिजे. त्यांचा सल्ला घेऊनच कोणताही निर्णय घेतला पाहिजे.