हॉटेलच्या रुममध्ये पांढऱ्या बेडशीटच का वापरतात?; कारण ऐकून हादरूनच जाल
हॉटेल्समधील पांढऱ्या बेडशीटचा वापर अनेक कारणांमुळे केला जातो. ब्लीचिंग सोपे असल्याने स्वच्छता राखणे सोपे होते. रंग फिकट पडण्याची शक्यता कमी असते. पांढरा रंग शांतता देतो आणि डोळ्यांना आरामदायी वाटतो. इंटीरियर डिझाइनमध्ये तो चांगला जुळतो आणि वापर झाला नसल्याची खात्री देते. यामुळे हॉटेल्स पांढऱ्या बेडशीट पसंती देतात.
तुम्ही जेव्हा कधी पिकनिकसाठी किंवा काही कामानिमित्ताने एखाद्या शहरात जाता तेव्हा आपसूकच हॉटेलमध्ये राहणं होतं. तुम्ही आतापर्यंत अनेक हॉटेलात राहिला असाल त्यामुळे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल. ती म्हणजे हॉटेलच्या रूममध्ये सफेद बेडशीट का वापरली जाते. तुम्ही कोणत्याही हॉटेलात जा तुम्हाला पांढऱ्या रंगाचीच बेडशीट दिसेल. त्यामुळे पांढऱ्या रंगाचीच बेडशीट का वापरली जाते? इतर रंगाची का नाही वापरत? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. आज आपण याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत.
ब्लीचिंग करणे सोपे
पांढऱ्या बेडशीटला चुकून डाग पडला तर त्याला ब्लीचिंग करणं सोपं जातं. हॉटेलात सफेद बेडशीट साफ करण्यासाठी नेहमीच ब्लीचचा वापर केला जातो. असं केल्याने कपड्यावरी किटाणू मरतात.
रंग फिका पडण्याचं टेन्शन नाही
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे इतर रंगांच्या बेडशीटचा रंग उडण्याची शक्यता असते. रंग फिक्कट पडण्याची शक्यता असते. पण सफेद बेडशीटबाबत असं होत नाही. चादरी साफ करण्यासाठी हेवी ब्लीच वापरलं जातं. रंगीत चादरी या हेवी ब्लीचमुळे फिक्क्या पडण्याची शक्यता असते. त्यामुळे या चादरी दिसायलाही खराब दिसतात. त्यामुळेच या हॉटेलातील चादरींचा रंग सफेद असतो.
दुर्गंधी येत नाही
हॉटेलमधील चादरीमधून दुर्गंधी येण्याची शक्यता असते. त्यामुळे या चादरी क्लोरीनने ब्लीच करतात.
स्ट्रेस दूर होतो
तुम्ही सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जाता. ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी जाता. जेव्हा तुम्ही हॉटेलात जाता तेव्हा समोरची सफेद बेडशीट पाहून तुम्ही प्रसन्न होता. हा रंग तुम्हाला शांतात देतो. तुम्हाला आकर्षित करतो. त्यामुळे तुमचा मनावरी तणाव दूर होतो.
शांती मिळते
सफेद रंग डोळ्यांसाठी चांगला असतो. त्यामुळे डोळ्यांना शांतता मिळते. त्यामुळेच आलेल्या पर्यटकांना किंवा गेस्टला स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी पांढऱ्या रंगाची चादर वापरली जाते.
रंगसंगती
इंटिरियर डिझाईनसोबत सफेद रंग चांगला असतो. त्यामुळे हॉटेलचे रुम सुंदर दिसण्यासाठी सफेद चादर किंवा टॉवेल ठेवली जाते.
वापर झाला नसल्याची खात्री
हॉटेलातील सफेद रंगाची टॉवेल, चादर पाहिल्यानंतर ती आधी कुणी वापरली नसल्याची खात्री पटते. इतर रंगामुळे तिचा वापर झाला की नाही हे कळायला मार्ग नसतो. पण पांढऱ्या चादरीमुळे ती स्वच्छ असल्याचंही दिसून येतं.