आंबा खाण्यापूर्वी पाण्यात ठेवणं का महत्त्वाचं? आहेत जबरदस्त फायदे
Mango Eating Tips : आंबा प्रत्येकाला आवडतो. वर्षातून एकदा अंबा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे आंब्याला मागणी देखील फार मोठी असते. पण आंबा खाताना कायळी घ्या एकदा जाणून घ्या... अनेक जण आंबा खाण्यापूर्वी पाण्यात ठेवतात, पण का? जाणून घ्या आयुर्वेद तज्ज्ञाकडून फायदे...
फळांचा राजा आंबा… वर्षातून एकदा आंबा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. आंब्याला मागणी देखील फार मोठ्या प्रमाणात असते. प्रत्येक जण आंबा खाण्यासाठी उत्सुक असतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आंबा प्रचंड आवडतो. पण काही जण आंबा खाण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेतात. काही जण आंबा खाण्यापूर्वी पाण्यात ठेवतात. पण आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का आणि किती वेळ ठेवायचा? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
आयुर्वेद एक्सपर्ट दीक्षा भावसार यांनी नुकतेच त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये आंबा पाण्यात भिजवणे का आवश्यक आहे. हे स्पष्ट केलं आहे. आंबा खाण्यापूर्वी पाण्यात ठेवल्याचा फायदा आपल्या शरीराला होतो… असं देखील आयुर्वेद एक्सपर्ट म्हणाले आहेत. (Mango Eating Tips)
View this post on Instagram
आयुर्वेद एक्सपर्ट यांनी दिलेल्या माहिती नुसार, पिकलेल्या आंबा खाण्यापूर्वी आंब्याला 1 ते 2 तास पाण्याला भिजत ठेवा. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर, तुम्ही 20 ते 30 मिनिटं देखील आंबा पाण्यात ठेवा आणि त्यानंतर तुम्ही आंबा खाऊ शकता.. आंब्याला पाण्यात भिजवणं का आहे गरजेचं?
एक्सपर्टने सांगितल्यानुसार, आंबा पाण्यात भिजवल्याने त्यातील अतिरिक्त फायटिक ॲसिड निघून जाते. हे एक प्रकारचे विरोधी पोषक आहे. जे शरीराला काही खनिजे जसे की लोह, जस्त, कॅल्शियम आणि इतर खनिजे शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करते. ज्यामुळे खनिजांची कमतरता होऊ शकते.
एवढंच नाहीतर, भिजवलेला आंबा खाल्ल्याचे अनेक चांगले फायदे आहेत. भिजवलेल्या आंबा खाल्ल्यामुळे त्वचेच्या समस्या, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आणि इतर आतड्यांसंबंधी समस्या टाळण्यास मदत होते. आंबा खाल्ल्याने वजन वाढण्यास देखील मदत होते… असं देखील एक्सपर्ट सांगातात.
(Disclaimer : वरील बातमी लिहिताना घरगुती उपाय आणि सामान्य माहितीची मदत घेतली आहे. त्यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधी काहीही अडचणी असतील तर, सर्वात आधी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.)