तिळगुळ खा निरोगी राहा असं का म्हणतात, खुप कमी लोकांना माहितीये याचे फायदे
हिवाळा सुरु झाला की अनेकांना सर्दी आणि खोकला सुरु होतो. आपली प्रतिकारशक्ती कमजोर झाल्यामुळे आपल्याने वातावरणात बदल झाला तरी देखील वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात आपण आपल्या आहारात देखील काही बदल केले पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या शरीरात उबदार पणा आणतील त्यांचे सेवन केले पाहिजे.
Benefits of Tilgul : हिवाळ्यात अनेक आजारांचा सामना करावा लागतो. कारण बदलत्या वातावरणामुळे सर्दी आणि खोकला सारख्या समस्या उद्भवतात. थंडी वाढल्याने अनेकांना दरवर्षी याचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात आपल्याला आहारात देखील तसा बदल करणं गरजेचं असतं. हिवाळा सुरु झाला की आपल्या शरीराला आपण उबदार ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिवाळ्यात ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यामुळे शरीर उबदार राहते. पण काजू-बदाम खाणे सगळ्यांनाच परवडणारे नसते. त्यामुळे तुम्ही त्याला पर्याय म्हणून इतर गोष्टींचा देखील आहारात समावेश करु शकता.
हिवाळ्यातील तीळ-गुळ हे सुपरफूड मानले जाते. कारण तीळ आणि गूळ शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी गुणकारी आहेत. आयुर्वेदात गूळ आणि तीळ खाण्याचे फायदे सांगितले आहेत. या दोन्ही गोष्टींपासून शरीरात उष्णता निर्माण होते. यामुळे आपले शरीर उबदार राहते. त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही तिळगुळाचे लाडू बनवून देखील खावू शकता.
थंडीत प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने बॅक्टेरिया झपाट्याने पसरतात. पण जर तुम्ही तीळ गूळ एकत्र करुन खालला तर सर्दी, खोकला आणि फ्लूचा धोकाही कमी होतो. तीळ आणि गुळाचा 1 लाडू किंवा 20-25 ग्रॅम तीळ रोज खाल्ल्याने याचे अनेक मोठे फायदे तुम्हाला मिळू शकतात.
तिळाचे फायदे
तिळामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी1, तांबे आणि जस्त आढळते. जे गुणकारी आहेत. तिळाच्या बियांमध्ये सेसमिन आणि सेसमोलिन नावाची दोन सर्वात महत्वाची संयुगे असतात जी कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करतात. तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो. तिळामध्ये फायटोस्टेरॉल आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात, जे शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात.
गुळाचे फायदे
गूळ शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतो. जे लोक रोज गूळ खातात त्यांच्या शरीरात लोहाची कमतरता नसते. गूळ खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. गूळ थकवा दूर करण्यास मदत करतो. गुळामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फिनोलिक अॅसिड असते ज्यामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसची पातळी कमी होते.
कोणी खाऊ नये तीळ-गुळ
मधुमेहाच्या रुग्णांनी तीळ गुळाचे जास्त सेवन करू नये. कारण गुळ खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. तिळाच्या बियांमध्ये काही सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड देखील असतात, ते जास्त खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णाने दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त तिळाचे सेवन करू नये.