मुंबई : लघवीला जाताना पाणी प्यायला पाहिजे की लघवी करून आल्यावर पाणी प्यायला पाहिजे, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तुम्ही जर लघवी करून आल्यावर लगेचच पाणी पित असाल तर सावधान. ही सवय करू शकते तुमचा घात. कारण ही सवय चुकीची असून तुम्ही आजाराला निमंत्रण देता.
निरोगी राहण्यासाठी गरजेचं
दिवसभरात पाणी भरपूर पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पाणी पिणं हे निरोगी राहण्यासाठी खूप गरजेचं आहे. असं म्हणतात पाणी भरपूर प्यायला पाहिजे त्यामुळे आपण अनेक रोगांपासून दूर राहू शकतो. पण पाणी कधी, केव्हा प्यायला पाहिजे यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आपली एक चुकीची गोष्ट आपण आजाराला निमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे लघवी (Urine) करून आल्यावर लगेचच पाणी पिणे (Drinking Water) योग्य आहे की अयोग्य असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांचं उत्तर आम्ही पण शोधण्याचा प्रयत्न केला. आम्ही काही तज्ज्ञांशी बोललो.
लघवीसंबंधित होऊ शकतात आजार
जर तुम्ही रोज लघवी करून आल्यावर लगेचच पाणी पित असेल तर थांबा.. पण कधी तरी करत असाल तर काही हरकत नाही. पण लगेचच पाणी प्यायला तर ही सवय चुकीची आहे. जर आपण रोज असं पाणी पित असेल तर लघवीसंबंधित आजार होऊ शकतात. तुम्हाला किडनी स्टोनची समस्या जाणवू शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे चुकूनही अशी सवय लावू नका आणि असल्यास लगेचच बदला.
शरीरातील घाण बाहेर पडण्यास मदत
लघवीवरून आल्यावर किमान 10-15 मिनिटांनी पाणी प्यावं. तर लघवीला जाण्यापूर्वी पाणी प्यायला तर योग्य आहे. पण इथेही तुम्ही जर 10-15 मिनिटांपूर्वी पाणी प्यायला तर याचा चांगला फायदा होता. सगळ्यात महत्त्वाचं सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी दोन-तीन ग्लास पाणी प्यायला हवं. यामुळे आपल्या शरीरातील घाण बाहेर पडण्यास मदत होते.
…तर आजारांपासून दूर राहू शकतो
डॉक्टर किंवा आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपण रोज 3-4 लिटर पाणी प्यायला हवं. शरीरात पाणी कमी झाल्यानेही आपण अनेक आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते निरोगी शरीरासाठी कुठलीही गोष्ट अती किंवा कुठलीही गोष्ट कमी करू नये. प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात केल्यास आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.