हिवाळ्यात ब्लड प्रेशर हाय; पथ्ये पाळा, आरोग्य सांभाळा

हिवाळ्यातील आल्हादायक वातावरण उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा अधिक हवेहवेसे वाटते. मात्र, संसर्गजन्य रोगांनी ग्रस्त व्यक्तींना हिवाळ्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबाने ग्रस्त रुग्णांनी हिवाळ्यात पुरेश्या प्रमाणात काळजी न घेतल्यास उबदार वाटणारा हिवाळा अपायकारक ठरू शकतो.

हिवाळ्यात ब्लड प्रेशर हाय; पथ्ये पाळा, आरोग्य सांभाळा
Blood Pressure
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 7:33 PM

नवी दिल्ली : बदलती जीवनशैली आणि आहार पद्धतीमधील बदलामुळे उच्च रक्तदाबाच्या (High Blood Pressure) समस्येने अनेकांना ग्रासले आहे. हिवाळ्यातील (Winter) आल्हादायक वातावरण उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा अधिक हवेहवेसे वाटते. मात्र, संसर्गजन्य रोगांनी ग्रस्त व्यक्तींना हिवाळ्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबाने ग्रस्त रुग्णांनी हिवाळ्यात पुरेश्या प्रमाणात काळजी न घेतल्यास उबदार वाटणारा हिवाळा अपायकारक ठरू शकतो.

..तर, हिवाळा अपायकारक

हिवाळ्यात तापमानाचा पारा घसरतो. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहाचा वेग मंदावण्याची शक्यता अधिक असते. शरीराला आवश्यक असणारी उष्णता योग्य प्रमाणात मिळत नाही. उच्च रक्तदाबाची समस्या हिवाळ्यात अधिक प्रमाणात भेडसावते. केवळ रक्तदाबाच्या पातळीत वाढ न होता त्यासंबंधित अन्य जटिल समस्या देखील उद्भवू शकतात.

उच्च रक्तदाबाची गंभीर लक्षणे

उच्च रक्तदाब किंवा हायपरटेंन्शनचे प्राथमिक अवस्थेतच निदान होणे महत्वाचे ठरते. प्राथमिक टप्प्यांत लक्षणे समजत नाही किंवा उशीराने निदान होते. उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य वेळी उपचार घेतल्यास भविष्यातील समस्या टाळणे शक्य ठरते.

लक्षणे उच्च रक्तदाबाची

  • अधिक प्रमाणात थकवा
  • तीव्र स्वरुपाची डोकेदुखी
  • स्मरणशक्तीचा वेग मंदावणे
  • नाकातून रक्त बाहेर पडणे
  • श्वसनविकार संबंधित जटिलता

उच्च रक्तदाबाला ठेवा नियंत्रित

उच्च रक्तदाबाने ग्रस्त रुग्णांच्या संख्येत अलीकडच्या काळात भर पडली आहे. ज्येष्ठ नागरिकांसोबत युवकांनाही रक्त दाबाच्या समस्यांनी ग्रासले आहे. जीवनशैलीतील बदलामुळे भेडसावणारा विकार आहे. जीवनशैलीतील अनुरुप बदलांद्वारे उच्च रक्तदाबाच्या विकारावर मात करणे सहज शक्य ठरते.

>> नियमित रक्तदाबाची तपासणी >> नियमित अंतराने वैद्यकीय तपासणी, डॉक्टरांचा सल्ला >> पोषक आहाराचे सेवन >> नियमित स्वरुपात व्यायाम. अधिक शारिरीक श्रमाचे व्यायामप्रकार टाळा. तज्ज्ञाच्या हजेरीत वर्कआऊट करा. >> थेट सूर्यप्रकाशात किंवा अति थंडीत अधिक वेळ बाहेर राहणे टाळा किंवा स्वत: च्या सुरक्षेची खबरदारी घ्या.

आहाराच्या टिप्स

नियमित संतुलित आहाराच्या सेवनाला प्राधान्य द्या. ताज्या पालेभाज्या, फळे आणि कमी फॅटची दुग्धोत्पादने यांचा आहारात समावेश करा. तुमच्या आहारात मिठाचे विशिष्ट प्रमाण असणे आवश्यक ठरते. धान्ये (whole grains), सुका मेवा (Dry fruits), मासे (Fish), अंडे (Egg) आणि अन्य पोल्ट्री प्रॉडक्ट्स (poultry) यांचा आहारात नियमित स्वरुपात समावेश करा.

इतर बातम्या :

पनीरची भाजी खाऊन कंटाळलायत? मग, घरच्या घरी बनवा झटपट पनीर फ्राइड राईस!

Honey for Skin : त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी ‘या’ खास पध्दतीने मध त्वचेला लावा!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.