काय गं सारखी युरिनला जातेय…काही त्रास होतोय का?…मैत्रिणे हे युरिन इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं
युरिन इन्फेक्शनची समस्या तरुणी आणि महिलांमध्ये खूप दिसून येतं. जर या युरिन इन्फेक्शनची काळजी वेळेवर घेतली नाही. तर इतर समस्या होण्याची भीती असते. त्यामुळे कसं ओळखणार तुम्हाला युरिन इन्फेक्शन झालं आहे, युरिन इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल आणि यावर घरगुती उपाय काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.
युरिन इन्फेक्शन हे सर्वसामान्य 100 पैकी 80 महिलांना होत असतं. त्यामुळे महिलांमध्ये ही सामान्य समस्या आहे. युरिन इन्फेक्शनला डॉक्टरी भाषेत UTI असं म्हणतात. तरुण मुलींमध्ये आणि नवविवाहित महिलांमध्ये ही समस्या प्रकर्षाने जाणवते. युरिन इन्फेक्शन होण्याचं प्रमुख कारण युरिन खूप वेळेसाठी रोखून धरली तर हा त्रास होतो. काय आहे युरिन इन्फेक्शन? युरिनरी कॉर्डमध्ये इन्फेक्शन म्हणजे युरिन इन्फेक्शन होणे. तर याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असंही डॉक्टर म्हणतात. युरिनरी कॉर्डमध्ये बॅक्टेरियामुळे संसर्ग होतो आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी जळजळ होते, आणि सारखं युरिन आली असं वाटतं. हे बॅक्टेरिया युरिनरी कॉर्डद्वारे शरिरात जातं आणि मग ब्लैडर आणि किडनीचं पण यामुळे नुकसान होऊ शकतं.
आता जाणून घेऊयात युरिन इन्फेक्शनची लक्षणं काय आहे लक्षणं
– युरिन करताना जळजळ होणे – ओटीपोट आणि कंबर दुखणे – युरिनचा रंग जास्त पिवळा होणे – सारखं युरिन आल्यासारखं वाटणं – युरिन अगदी कमी प्रमाणात होणे, अगदी काही थेंब युरिन होणे – युरिनमधून दुर्गंध येणे – भूक न लागणे – थकवा येणे – काही वेळा सर्दी आणि तापही येतो युरिन इन्फेक्शन होण्याची कारणे – युरिन खूप वेळेसाठी रोखून धरणे – मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाणे – पाणी पिण्याचे प्रमाण कमी असणे – जास्त प्रमाणात औषधांचं सेवन – अस्वच्छ बाथरुमचा वापर – किडनी स्टोनमुळे – हाइजीन न बाळगणे
काय आहे घरगुती उपाय
– पाच-सहा लहान वेलचीचे दाणे घ्या आणि ते बारीक करुन त्यात अर्धा चमचा सुंठ पावडर मिक्स करा. गरम पाण्यात सेंधा नमक आणि डाळिंबाचा रस मिसळून तो प्या. – एक चमचा आवळा पावडरसोबत चार-पाच वेलचीची पूड मिक्स करा आणि ती घ्या. – दही आणि ताक घ्यावं. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. – नारळ पाणीही युरिन इन्फेक्शनच्या वेळी घेणं खूप चांगल आहे. गरम पाण्यात दोन चमचे सफरचंद व्हिनेगर आणि मध मिसळून प्यावं
युरिन इन्फेक्शन होऊ नये यासाठी काय घ्याल काळजी
– भरपूर पाणी प्या – आहारात दही आणि ताक पिण्याची सवय लावा – सगळ्यात महत्त्वाचं कधीही युरिन रोखून धरु नका – कायम स्वच्छ शौचालयचा वापर करा – हाइजीनची विशेष काळजी घ्यावी