World Mental Health Day: ‘ या ‘ सवयीमुळे बिघडू शकते तुमचे मानसिक आरोग्य
10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त आम्ही तुम्हाला मानसिक आरोग्याविषयी काही गोष्टी सांगणार आहोत.
बिघडलेल्या मानसिक आरोग्याची (mental health) समस्या आजकाल खूप सामान्य झाली असून त्याच्या रुग्णांमध्येही सातत्याने वाढ होतान दिसत आहे. अतिशय व्यस्त जीवन, वाढत्या जबाबदाऱ्या आणि बिघडलेली जीवनशैली (bad lifestyle) यामुळे आपले मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. आपल्या रोजच्या जीवनातील एक सवय या सर्व समस्यांपेक्षा मोठी असून, इच्छा असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे एका अहवालात (report)नमूद करण्यात आले आहे.
त्याचे तोटे, त्यापासून होणारे नुकसान माहीत असूनही आपण ती सवय सोडवू शकत नाही. आज, 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण मानसिक आरोग्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. अशा काही सवयींबद्दल जाणून घेऊया, ज्या आपल्याला मानसिकरित्या आजारी करू शकतात.
जागतिक मानसिक आरोग्य दिवस का साजरा केला जातो ?
जगभरात दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. असे म्हटले जाते की, वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 1992 साली 10 ऑक्टोबर रोजी जागतक मानसिक आरोग्य दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. आणि तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. काही शारीरिक व्याधी असेल तर लोक शारीरिक उपचारांसाठी पावलं उचलतात. परंतु बऱ्याच लोकांना हे माहीतही नसते की ते मानसिकरित्या आजारी आहेत. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे, हे सांगणे जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करण्यामागचे उद्दिष्ट आहे.
या सवयी आपल्याला मानसिकदृष्ट्या आजारी करू शकतात –
आजकाल जगातील बहुतांश जनता फोन वापरण्यात अतिशय व्यस्त आहे. फोनचा अतिवापर केल्यास त्याचा आपल्या शरीरावर, डोळ्यांवर आणि मनावर खूप वाईट परिणाम होतो, हे माहीत असूनही लोक मोबाईलवर तासनतास वेळ घालवतात. तरुण पिढीतील मुलं तर रात्रभर फोन किंवा इतर डिजीटल स्क्रीनवर वेळ वाया घालवतात. यामुळे रात्री लवकर झोप येत नाही आणि त्याचा परिणाम दिवसा दिसून येतो, कारण अशा लोकांना त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. फोनचा अतिवापर केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडते, ज्यामुळे डोके दुखणे किंवा डोके जड होणे, ही समस्याही अनेकदा कायम राहते.
अशा प्रकारे चांगले ठेवा मानसिक आरोग्य –
– दररोज व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सयुक्त पदार्थांचे सेवन करावे. तुमच्या आहारात बदामाचा समावेश अवश्य करावा, कारण तो मेंदूसाठी अतिशय महत्वपूर्ण मानला जातो.
– जर तुम्हाला स्क्रीनवर (कामानिमित्त) जास्त वेळ घालवावा लागत असेल, तर मधे-मध्ये थोडा ब्रेक घ्यावा. तुम्ही 20-20-20 हा नियम पाळू शकता. त्यामध्ये तुम्ही कामातून 20 मिनिटांनी ब्रेक घ्या, 20 मीटर दूर बघा आणि 20 वेळा पापण्या बंद करा – उघडा, असा व्यायाम करावा.
– तुमचे मानसिक आरोग्य बिघडले आहे असे जर तुम्हाला असे वाटत असेल की तर दररोज मेडिटेशन करावे. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी फारसे कष्ट करावे लागत नाही व मेडिटेशन हे कुठेही, कोणत्याही जागी करता येऊ शकते.