तुम्ही ब्रेकफास्ट करत नसाल तर जरा इकडे लक्ष द्या, गंभीर आजारांना निमंत्रण मिळू शकतं
आपलं आरोग्य बिघडण्यासाठी आपल्या स्वतःच्याच काही सवयी कारणीभूत असतात. आणि त्या सवयीच आपल्याला ह्रदयरोगा बनवतात. त्याच वाईट आणि घातक सवयींची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे.
मुंबईः कायम व्यस्त झालेलं जीवन आणि जगण्याची विचित्र पद्धतीमुळे अनेक जणांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आरोग्याच्या या समस्यांमध्ये मधूमेह (Diabetes), रक्तदाबसारख्या (Blood pressure) समस्यांबरोबर लढावे लागत आहे. हा त्रास ज्या लोकांना होत असतो ते नेहमीच चिंताग्रस्त (Nervous) असलेले दिसतात. चिंताग्रस्ततेमुळे त्यांच्या कामावरही त्याचा विपरित परिणाम होतो. आरोग्याच्या या गंभीर समस्या शरीराला जडतात त्यावेळी त्याची सर्व जबाबदारी ही आपलीच असते. आयुष्य जगण्याची हीच पद्धत कायम ठेवली तर ह्रदयविकार व्हायला वेळ लागणार नाही.
बदलत्या जगण्याच्या सवयीमुळे आणि काही चुकांमुळे चांगल्या आयुष्याची कशी वाताहात होते हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हृदयरोगी होऊ शकता. त्यासाठी या चार सवयींची माहिती करुन घ्या
ब्रेकफास्ट न करणे आणि घातक चार सवयी
आपलं आरोग्य बिघडण्यासाठी आपल्या स्वतःच्याच काही सवयी कारणीभूत असतात. आणि त्या सवयीच आपल्याला ह्रदयरोगा बनवतात. त्याच वाईट आणि घातक सवयींची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे. या सवयी तुम्हाला असतील तर तुम्ही ह्रदयरोगी होऊ शकता. त्या चार सवयी आहेत कोणत्या माहिती आहेत का?
हिरड्यांचा त्रास
तुम्हाला जर हिरड्यांचा त्रास होत असेल तर त्याची काळजी घ्या. कारण तुम्हाला आता अजब वाटेल की हिरड्यांचा आणि ह्रदयाचा काय संबंध म्हणून. पण हिरड्यांचा तुम्हाला त्रास जाणवत असेल तर हिरजड्यांमध्ये तयार झालेले जिवाणू हे रक्तवाहिन्यांमध्ये समस्या निर्माण करू शकतात. त्याचा असा परिणाम हा थेट ह्रदयावर होऊन हिरड्यांचा त्रास असणाऱ्याला ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे हिरड्यांचा तुम्हाला त्रास होत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
ब्रेकफास्ट चुकवत असाल तर इकडे लक्ष द्या
तुमचं बिझी शेड्यूल असेल आणि तुम्ही ब्रेकफास्ट करण्याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. आहारतज्ज्ञांच्या मते तुम्ही जर सतत ब्रेकफास्ट चुकवत असाल तर तुम्हाला डायबेटिज होण्याची शक्यता जास्त असते. नाष्टा न करणारी सकाळच्या वेळेत काही खात नाहीत, दुपारी मात्र ते प्रचंड खातात. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढतो. आणि वाढलेला कोलेस्ट्रॉल ह्रदयासाठी कधीही घातकच असतो.
पाणी कमी पिण्यामुळे
शरीराला जसं अन्न गरजेचे आहे, तसच पाणीही महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर रोज पाणी कमी पित असाल तर तुम्हाला ह्रदयरोग होण्याची जास्त संभवना आहे. पाणी कमी पिल्यामुळे फक्त ह्रदयविकारच होऊ शकतो असं नाही तर शरीराच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते शरीरासाठी रोज अडीच ते तीन लिटर पाणी शरीरासाठी फायदेशीर असते.
शिफ्टमध्ये काम करणे
ऑफिसमध्ये तुम्हाला खूप काम असतं म्हणून तुम्हाल अनेक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावे लागते. काम करताना शिफ्ट कोणतीही असू दे त्यामुळे तुमची जगण्याची स्टाईल बदलते. त्यामुळे रोजच्या जगण्याची पद्धत बदलते, आणि त्याचा विचित्र परिणाम शरीरावर होतो. त्याचा सगळ्यात वाईट परिणाम होतो म्हणजे ह्रदयावर. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या.
संबंधित बातम्या
Take Care: कोरोना बरा झाला? तर आधी तुमच्या ह्रदयाची काळजी घ्या, 20 रोगांचा धोका आहे ह्रदयाला
‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेमात आंधळे झालात तर होईल फसवणूक, ‘ही’ खबरदारी घ्या आणि धोका टाळा